शरीरावर दाट केस जास्त बुद्धीमत्तेच निदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2016 14:04 IST2016-04-14T14:04:15+5:302016-04-14T14:04:15+5:30

शरीरावरील दाट केस हे जास्त बुद्धीमतेचं निदर्शक असल्याचं एका अभ्यासातून समोर आले आहे.

Dense hair on the body is more intelligent than the indicator | शरीरावर दाट केस जास्त बुद्धीमत्तेच निदर्शक

शरीरावर दाट केस जास्त बुद्धीमत्तेच निदर्शक

ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. १४ - शरीरावरील दाट केस हे जास्त बुद्धीमतेचं निदर्शक असल्याचं एका अभ्यासातून समोर आले आहे. डॉ. ऐकाराकुडी अलायस मागच्या २२ वर्षांपासून शरीरावरचे केस आणि बुद्धीमतेचा संबंध या विषयावर अभ्यास करत आहेत. इतर सर्वसामान्यांच्या तुलनेत शरीरावर जास्त केस असणारे जास्त उच्च शिक्षित असतात तसेच बहुतांश डॉक्टरांच्या छातीवर जास्त केस असतात असे या अध्ययनातून समोर आले आहे. 
 
डॉ. ऐकाराकुडी यांनी अमेरिकेतील वैद्यक शाखेच्या विद्यार्थ्यांचा  अभ्यास केला. त्यात त्यांना ४५ टक्के पुरुष प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या शरीरावर जास्त केस आढळले. इतर सर्वसामान्यांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी जणांच्या शरीरावर जास्त केस होते. दक्षिण भारतात केरळमध्ये मेडीकल, इंजिनियरींग आणि कामागारांचा अभ्यास करण्यात आला. 
 
त्यामध्ये कामागारांपेक्षा मेडीकल, इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांच्या शरीरावर जास्त केस आढळले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तपासली त्यामध्ये जास्त केस असणारे विद्यार्थी अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत पुढे होते असे अलायस यांनी सांगितले. 
 

Web Title: Dense hair on the body is more intelligent than the indicator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.