पोलन्स्की यांच्या प्रत्यार्पणास नकार

By Admin | Updated: October 30, 2015 21:52 IST2015-10-30T21:52:48+5:302015-10-30T21:52:48+5:30

१९७७ साली एका १३ वर्षे वयाच्या मुलीवर अतिप्रसंग केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरलेले आणि अमेरिकी न्यायालयाने फरार घोषित केलेले आॅस्कर विजेते ज्येष्ठ दिग्दर्शक रोमन पोलन्स्की

Denial of Polanski's attestation | पोलन्स्की यांच्या प्रत्यार्पणास नकार

पोलन्स्की यांच्या प्रत्यार्पणास नकार

वॉर्सा : १९७७ साली एका १३ वर्षे वयाच्या मुलीवर अतिप्रसंग केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरलेले आणि अमेरिकी न्यायालयाने फरार घोषित केलेले आॅस्कर विजेते ज्येष्ठ दिग्दर्शक रोमन पोलन्स्की (८२) यांच्या प्रत्यार्पणास पोलंडच्या एका न्यायालयाने नकार दिला आहे.
पोलन्स्की १९७७ पासून पोलंडमध्ये वास्तव्यास असून, त्यांचे प्रत्यार्पण करावे, अशी मागणी अमेरिकेने केली होती. सध्या ते पोलंडमध्येच चित्रपट निर्मितीत व्यस्त आहेत. पोलन्स्की यांनी अमेरिकेत एका १३ वर्षीय मुलीशी अतिप्रसंग केल्याचा वहीम होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Denial of Polanski's attestation