‘दंडेलशाहीने राहणार नाही आशिया सुरक्षित’
By Admin | Updated: November 16, 2014 02:05 IST2014-11-16T02:05:39+5:302014-11-16T02:05:39+5:30
आशिया खंडाच्या सुरक्षिततेचा प्रश्न दंडेलशाही वा धमकावून सोडवला जाऊ शकत नाही, तर परस्पर सामंजस्याने, असे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केले.

‘दंडेलशाहीने राहणार नाही आशिया सुरक्षित’
ब्रिस्बेन : आशिया खंडाच्या सुरक्षिततेचा प्रश्न दंडेलशाही वा धमकावून सोडवला जाऊ शकत नाही, तर परस्पर सामंजस्याने, असे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केले. मोठे देश छोटय़ांवर दबाव आणून सुरक्षिततेचा प्रश्न सोडवू शकत नाहीत.
जी-2क् समूहाच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी येथे आलेल्या ओबामा यांनी विद्याथ्र्याना संबोधित केले. यावेळी त्यांनी प्रादेशिक सुरक्षेचा प्रश्न परस्पर सहकार्याने सोडविण्यावर भर दिला.
आशिया-पॅसिफिक भागाच्या सहका:यांबाबत कोणताही प्रश्न उपस्थित होत नसल्याचे स्पष्ट करीत त्याबाबत आपण कटिबद्ध असल्याचे ओबामा म्हणाले.
दोनदिवसीय जी 2क् शिखर परिषदेत आर्थिक वृद्धीला चालना देण्यासाठी विचारविनिमय होणार आहे. शिखर परिषदेत अमेरिका, चीन आणि रशिया या देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी होत असून त्यांचा भर आर्थिक वृद्धीवर राहणार आहे.
युक्रेन प्रश्न आणि इबोलाचा धोका यावरही चर्चा होणो अपेक्षित आहे. दुसरीकडे आंदोलकांद्वारे हवामान बदलावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी रेटली जात आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस बान की मून यांनी या मुद्यांवर भर देण्याचे आवाहन जी-2क् देशांना केले आहे. (वृत्तसंस्था)