लोकशाही मानणा-यांना संपवलेच पाहिजे - आयएस
By Admin | Updated: December 23, 2014 08:34 IST2014-12-23T05:51:52+5:302014-12-23T08:34:28+5:30
लोकशाही मानणा-या सर्वांना संपवलेच पाहिजे अशी आयएस या दहशतवादी संघटनेची धारणा आहे, असे जर्मन पत्रकार जुर्गेन टोडनहोफर यांनी म्हटले आहे.
_ns.jpg)
लोकशाही मानणा-यांना संपवलेच पाहिजे - आयएस
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8000001907349px;">ऑनलाइन लोकमत
मॉस्को, दि. २२ -लोकशाही मानणा-या सर्वांना संपवलेच पाहिजे अशी आयएस या दहशतवादी संघटनेची धारणा आहे, असे जर्मन पत्रकार जुर्गेन टोडनहोफर यांनी म्हटले आहे. इराक व सीरियात सक्रिय असलेली दहशतवादी संघटना असलेल्या 'आयएस'च्या क्षेत्रात प्रवेश करून तेथे दहा दिवस घालवणारे टोडनहोफर हे पहिले पत्रकार आहेत. पश्चिमी राष्ट्रांच्या कल्पनेपेक्षा आयएस अधिक शक्तिशाली व धोकादायक बनल्याचे त्यांनी नमूद केले आहे. टोडनहोफर यांनी तेथे घालवलेल्या दिवसांबद्दलचा आपला अनुभव ' १० डेज इन इस्लामिक स्टेट' या रिपोर्टमध्ये मांडला असून आयएसची विचारसरणी, त्यांचे राहणीमान, त्यांची कार्यपद्धती अशा अनेक विषयांवर त्यांनी लिहीले आहे.
ज्या अमेरिकन पत्रकाराचा ( जेम्स फॉली) आयएसच्या दहशतवाद्यांनी शिरच्छेद केला होता, तो जेथे राहत होत, त्याच हॉटेलमध्ये टोडनहोफही राहिले होते. मी तो (शिरच्छेदाचा ) व्हिडीओ पाहिला होता आणि तसं काही माझ्यासोबत होऊ नये अशीच प्रार्थना मी करत होतो, असे टोडनहोफ म्हणाले.
'आयएस'ने कब्जा केलेला परिसर अतिशय विशाल असून जगाच्या कानाकोप-यातून दररोज शेकडो तरूण या संघटनेत सहभागी होण्यासाठी येत असतात. मोसूलमध्ये ५ हजारांहून अधिक तरूण असून ते सर्वत्र विखुरलेले आहेत व तेथील स्थानिकांचा त्यांना पाठिंबा आहे. लष्करी कारवाई किंवा हवाई हल्ले करून त्यांचा खात्मा करण्याचा प्रयत्न केला तर अख्खे शहरच जमीनदोस्त होईल. त्या भूमीवर पडलेल्या प्रत्येक बॉम्बमुळे व जखमी झालेल्या प्रत्येक नागरिकामुळे दहशतवाद्यांची संख्या वाढत जाते, असे टोडनहोफ यांनी म्हटले आहे.
संपूर्ण जगावर कब्जा करणे तसेच लोकशाही मानणा-या सर्वांना संपवणे हाच आयएसचा समज असल्याचे तेथील वातावरण पाहून स्पष्ट होत असल्याचे टोडनहोफ यांनी नमूद केले आहे. मात्र मोझेस, जिजस आणि मोहम्मदला मानत असल्याने ज्यू व ख्रिश्चन धर्मीयांचे प्राण मात्र वाचतील, असेही टोडनहोफ यांनी म्हटले आहे. मात्र इतर सर्व धर्मीयांना मारले पाहिजे, अशी त्यांची धारणा असल्याचे टोडनहोफ यांनी नमूद केले आहे.