शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

'कॅनडामधून ८ लाख हिंदूंना बाहेर काढण्याची मागणी', खलिस्तानींनी काढली परेड; पंतप्रधान कार्नी यांच्याविरोधात प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 12:41 IST

कॅनडामधील टोरंटोमधील माल्टन गुरुद्वारामध्ये हिंदूविरोधी परेड काढण्यात आली आणि हिंदूंना हद्दपार करण्याचे आवाहन करण्यात आले.

कॅनडातील टोरंटो येथून हिंदूविरोधी परेड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅनडातील अलिकडच्या निवडणुकीत मार्क कार्नी विजयी होऊन पुन्हा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्याच्या वेळी ही परेड आयोजित करण्यात आली होती. यापूर्वी, जस्टिन ट्रूडो यांच्या कार्यकाळात, कॅनडाचे भारताशी संबंध सतत तणावपूर्ण होते आणि आता या परेडमुळे नवीन पंतप्रधानांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का

कॅनेडियन पत्रकार डॅनियल बोर्डमन यांनी रविवारी टोरंटोमधील माल्टन गुरुद्वारामध्ये कथित "हिंदूविरोधी परेड" दाखवणारा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओच्या निमित्ताने बोर्डमनने कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या सरकारला सवाल केले की, ते माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याप्रमाणे खलिस्तानवाद्यांशी सौम्य वागतील की कठोर भूमिका घेतील?, असा सवाल केला आहे. 

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट शेअर केली आहे. यामधध्ये बोर्डमन यांनी लिहिले की, "आपल्या रस्त्यावर दहशत पसरवणारे जिहादी आपल्या सामाजिक रचनेला हानी पोहोचवत आहेत आणि उघडपणे धमकावत आहेत. पण द्वेष पसरवण्याच्या या शर्यतीत खलिस्तानी देखील मागे नाहीत. मार्क कार्नी यांचा कॅनडा जस्टिन ट्रुडोच्या कॅनडापेक्षा वेगळा असेल का?"

बोर्डमन यांनी हे विधान शॉन बिंदा नावाच्या दुसऱ्या वापरकर्त्याच्या पोस्टला उत्तर देताना केले आहे, यामध्ये बिंदा यांनी दावा केला होता की माल्टन गुरुद्वारातील खलिस्तानी गटाने कॅनडामध्ये राहणाऱ्या ८ लाख हिंदूंना भारतात पाठवण्याची मागणी केली होती. त्यांनी याला खलिस्तानी दहशतवाद्यांचा "खुला हिंदूविरोधी द्वेष" असे वर्णन केले.

"८ लाख हिंदूंना भारतात पाठवण्याची मागणी"

बिंदा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "माल्टन गुरुद्वारा येथे के-गँगने ८ लाख हिंदूंना भारतात पाठवण्याची मागणी केली. हे हिंदू त्रिनिदाद, गयाना, सुरीनाम, जमैका, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स, मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर, केनिया आणि इतर अनेक देशांमध्ये स्थायिक आहेत. हा भारत सरकारचा निषेध नाही, हा स्पष्टपणे हिंदूंविरुद्ध द्वेष आहे.", असंही या पोस्टमध्ये लिहिले आहे.

टॅग्स :Canadaकॅनडा