Coronavirus : डेल्टा व्हेरिएंटचा 104 देशांमध्ये संसर्ग; लवकरच संपूर्ण जगात पसरण्याची WHO कडून चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 08:50 AM2021-07-14T08:50:05+5:302021-07-14T09:06:09+5:30

Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरून गेल्या काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने अनलॉक करण्याच्या प्रक्रियेतून जात असलेल्या देशांना फटकारले होते.

delta variant spread in 104 countries who said soon it may dominate the whole world | Coronavirus : डेल्टा व्हेरिएंटचा 104 देशांमध्ये संसर्ग; लवकरच संपूर्ण जगात पसरण्याची WHO कडून चिंता

Coronavirus : डेल्टा व्हेरिएंटचा 104 देशांमध्ये संसर्ग; लवकरच संपूर्ण जगात पसरण्याची WHO कडून चिंता

Next

जगभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव अद्याप सुरूच आहे. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट जगातील जवळपास 104 देशांमध्ये पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम घेब्रेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी ही माहिती दिली आहे. या वेगाने पसरणार्‍या व्हेरिएंटमुळे (Coronavirus Variant) मृत्यू आणि संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हा व्हेरिएंट लवकरच जगभरात पसरू शकतो, असे ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरून गेल्या काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने अनलॉक करण्याच्या प्रक्रियेतून जात असलेल्या देशांना फटकारले होते.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख म्हणाले, 'नवीन व्हेरिएंट 'डेल्टा' जगभरात वेगाने पसरत आहे, त्यामुळे संसर्गाची संख्या आणि जीव गमावलेल्या लोकांची संख्या वाढत आहे. डेल्टा व्हेरिएंट आता 104 देशांमध्ये पसरला आहे आणि तो संपूर्ण जगातील सर्वात प्रबळ व्हेरिएंट होण्याची शक्यता आहे.' दरम्यान,  कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची पहिली घटना भारतात आढळली होती.


जास्त लसीकरण कव्हरेज असलेल्या ठिकाणी कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. हा विशेषतः अशा लोकांमध्ये संक्रमित होत आहे, जे संरक्षण घेत नाहीत आणि धोक्याचे पाऊल उचलत आहेत. लसीकरण कमी असलेल्या देशांमध्ये सुद्धा परिस्थिती विशेषतः वाईट आहे, असे ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी म्हटले आहे. तसेच, डेल्टा आणि इतर वेगवान संसर्ग होणाऱ्या व्हेरिएंट प्रकरणांची विनाशकारी लहर चालत आहे, ज्यामुळे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची भरती आणि मृत्यूची संख्या वाढत आहे. केवळ सार्वजनिक आरोग्य उपायांसह व्हायरसच्या सुरुवातीच्या लाटेंचा प्रतिकार करणाऱ्या देशांमध्ये आता उद्रेक झाला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख म्हणाले.

आपल्याला बिघडत चाललेल्या सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे जीव, जीवनमान आणि जागतिक आर्थिक पुनर्प्राप्तीसाठी धोका बनू शकते. ज्या ठिकाणी लसी कमी आहेत आणि संसर्गाची लहर सुरू आहे. त्या ठिकाणी हे अत्यंत वाईट आहे, असे ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी सांगितले. 


अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनीही डेल्टा व्हेरिएंटाचा उल्लेख केला होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या 6 पैकी 5 क्षेत्रात कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच, आफ्रिकेत मृत्यूचे प्रमाण दोन आठवड्यांत 30 टक्क्यांवरून 40 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. वेगाने पसरलेला डेल्टा व्हेरिएंट, जगभरातील लसीकरणाची संथ गती आणि सुरक्षा उपाय सुलभ करणे ही प्रकरणे वाढण्याची सर्वात मोठी कारणे आहेत, असे सौम्या स्वामीनाथन म्हटले होते.

Web Title: delta variant spread in 104 countries who said soon it may dominate the whole world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.