डेल्टा एअर लाइनची सेवा विस्कळीत
By Admin | Updated: August 9, 2016 02:04 IST2016-08-09T01:48:58+5:302016-08-09T02:04:07+5:30
लाखो प्रवाशांना फटका; काही प्रमाणात वाहतूक सुरू.

डेल्टा एअर लाइनची सेवा विस्कळीत
अटलांटा (जॉजिर्या): आंतरराष्ट्रीय संगणक यंत्रणेतील बिघाडामुळे तब्बल सहा तास ठप्प झालेली डेल्टा एअर लाइनची सेवा अखेर र्मयादित स्वरुपात सोमवारी रात्री सुरू झाली. या बिघाडामुळे अमेरिक ा, जपान, इटलीसह जगभरातील लाखो प्रवाशांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
डेल्टा ही जगातील दुसरी सर्वात मोठी हवाई सेवा असून, अँटलांटा येथील पॉवर हबमध्ये झालेल्या बिघाडामुळे जगभरातील संगणक तथा संचार यंत्रणा ठप्प झाली आहे. यामुळे ४५१ विमानाच्या फेर्या रद्द करण्यात आल्या असून डेल्टा एअर लाइनला करोडो डॉलर्सचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या घटनेची व्याप्ती पाहता विमानसेवा पूर्ववत होण्यासाठी दोन दिवसांचा अर्थात बुधवारपर्यंत वेळ लागणार असल्याचे डेल्टा एअर लाइनच्या सूत्रांनी स्पष्ट केले.