तालिबान म्होरक्याला हवाली करा -पाक

By Admin | Updated: June 21, 2014 02:07 IST2014-06-21T02:07:32+5:302014-06-21T02:07:32+5:30

नूरीस्तानमधील दहशतवादी संघटनांचे छुपे अड्डे उद्ध्वस्त करण्याची मागणीही पाकने अफगाण सरकारला केली आहे.

Deliver to the Taliban leader - Pak | तालिबान म्होरक्याला हवाली करा -पाक

तालिबान म्होरक्याला हवाली करा -पाक

>इस्लामाबाद:  तेहरिक-ए-तालिबान या संघटनेचा प्रमुख मुल्ला फझलुल्लाह याला पाकिस्तानच्या हवाली करण्याच्या मागणीसोबत कूनार आणि नूरीस्तानमधील दहशतवादी संघटनांचे छुपे अड्डे उद्ध्वस्त करण्याची मागणीही पाकने अफगाण सरकारला केली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वतीने पश्तून नेते महमूद खान अचाकझाई यांनी ही मागणी केली आहे. बुधवारी काबूल येथे त्यांनी अफगाणचे अध्यक्ष हमीद करझाई यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी उपरोक्त मागणी केली, असे एक्स्प्रेस ट्रय़ुबूनच्या वृत्तात म्हटले आहे. दहशतवादाविरोधी काबूलचे सहकार्य मागण्यासाठी  पंतप्रधान शरीफ यांचे खास दूत अजीज अहमद चौधरी यांच्यासमवेत अचाकझाई यांनी अफगाणला भेट दिल्याच्या वृत्तास विदेश मंत्रलयाने दुजोरा दिला आहे. (वृत्तसंस्था)
 

Web Title: Deliver to the Taliban leader - Pak