शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Deep Dive Dubai : १९६ फुट खोल घेता येणार पोहण्याचा आनंद; पाहा कसा आहे जगातील सर्वात खोल पूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 14:09 IST

Deep Dive Dubai: दुबईचे क्राऊन प्रिन्स हमगन बिन मोहम्मद अल मकतून यांनी शेअर केला Deep Dive Dubai चा आकर्षक व्हिडीओ. पाहा व्हिडीओ.

ठळक मुद्देदुबईचे क्राऊन प्रिन्स हमगन बिन मोहम्मद अल मकतून यांनी शेअर केला Deep Dive Dubai चा आकर्षक व्हिडीओ.

पाणी पाहिलं की अनेकांना पोहण्याचा मोह आवरत आहे. पाणी जितकं खोल तितका थरारही अधिक आणि त्याच्याप्रति लोकांचं आकर्षणही वाढत जातं. अशा परिस्थितीत दुबईचे क्राऊन प्रिन्स हमदन बिन मोहम्मद अल मकतूम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दुबईच्या डीप डाईव्ह पूलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओनंतर लोकांकडून त्याबद्दल उत्तम प्रतिक्रिया मिळत आहेत. संपूर्ण जग तुमचं डीप डाईव दुबईमध्ये वाट पाहत आहे, असा संदेशही त्यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिला आहे. हा जगातील सर्वात खोल असलेला पूल आहे. याची खोली ६० मीटर म्हणजेच १९६ फुट आहे. क्राऊन प्रिन्स यांनी शेअर केलेल्या व्हिडीओध्ये काही स्विमर्स पूलमध्ये डाईव करताना दिसत आहेत.

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं गेल्या महिन्यात या पूलाच्या खोलीबाबत माहिती पडताळली होती. त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार क्राँक्रिटचा वापर करून तयार करण्यात आलेल्या पूलची खोली ६०.०२ मीटर आहे. याशिवाय यामध्ये अधिक खोल गेल्यावर निरनिराळ्या थीम्सही दिसून येतात. यामध्ये डायविंगच्या अनुभवासाठी अनेक प्रकार वापरण्यात आले आहे. सुरूवातीला याचा वापर केवळ खासगी वापरासाठी करण्यात येत होता. परंतु या महिन्यापासून सर्वांना या पूलचा आनंद घेता येणार आहे.यापूर्वी १५० फुटाचा रिकॉर्डडीप डाईव दुबईच्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार हा पूल लवकरच सर्वांसाठी खुला केला जाणार आहे. तसंच सर्वांना याचा अनुभव घेता येणार आहे. या पूलच्या ओपनिंगशी निगडीत सर्व अपडेट्ससाठी आपल्याशी जोडून राहण्याचं आवाहनही त्यांनी केला आहे. यापूर्वी जगातील सर्वात खोल असलेल्या पूलाचा विक्रम पोलंडच्या डीपस्पॉटच्या नावे होते. याची खोली ४५.५ मीटर म्हणजेच १५० फूट होती.

टॅग्स :DubaiदुबईSwimmingपोहणेInternationalआंतरराष्ट्रीय