शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होणार? भारताच्या प्रयत्नांना मोठं यश मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 11:48 IST

वारंवार खोडा घालणाऱ्या चीनचा नरमाईचा सूर

नवी दिल्ली: जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा समावेश आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत केला जाण्याची शक्यता आहे. चीननं नरमाईची भूमिका घेतल्यानं संयुक्त राष्ट्राकडून अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं. अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नांमध्ये चीननं वारंवार खोडा घातला. मात्र आता अजहर प्रकरणात अडथळा आणला जाणार नसल्याचे संकेत चीनकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आज या विषयावर मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत अनेकदा मतदानासाठी आला. मात्र चीननं प्रत्येकवेळी नकाराधिकाराचा वापर करुन भारताच्या प्रयत्नांना सुरुंग लावला. चीननं वारंवार तांत्रिक मुद्दे उपस्थित करत भारताच्या प्रयत्नांवर पाणी फेरलं. मात्र आता चीननं नरमाईचं धोरण स्वीकारल्यानं अजहरबद्दल मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. आज हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. अजहरचा समावेश आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत झाल्यास ते भारतासाठी मोठं यश ठरेल.फेब्रुवारी महिन्यात पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली. यानंतर अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटननं चीनवर दबाव आणला. अजहरबद्दल ठोस भूमिका घेण्यासाठी चीनवर दडपण आणण्यात आलं. काही आठवड्यांपासून हे देश चीनचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होते. यानंतर काल चीननं काहीशी नरमाईची भूमिका घेतली. याविषयी विचार-विमर्श सुरू असून त्यात थोडी प्रगती झाल्याचं चीनकडून सांगण्यात आलं. हे प्रकरण बुधवापर्यंत सुटेल का, असा प्रश्न परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांना विचारण्यात आला. त्यावर योग्य पद्धतीनं हा प्रश्न सुटेल असा विश्वास वाटत असल्याचं उत्तर शुआंग यांनी दिलं.  

टॅग्स :masood azharमसूद अजहरJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला