अमेरिकेतील मृतांचा आकडा 70,000 पार, जगभरात कोरोनाचा हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 09:25 AM2020-05-06T09:25:31+5:302020-05-06T09:27:43+5:30

जॉन हॉप्किन्गस युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 24 तासात 2333 जणांचा जीव गेला आहे. तर जगभरात आत्तापर्यंत 2,55,176 जण मृत्युमुखी पडले आहेत

The death toll in the United States has crossed 70,000, with a worldwide outbreak of corona MMG | अमेरिकेतील मृतांचा आकडा 70,000 पार, जगभरात कोरोनाचा हाहाकार

अमेरिकेतील मृतांचा आकडा 70,000 पार, जगभरात कोरोनाचा हाहाकार

Next

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 2,55,176 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 36 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 36, 90,863 पेक्षा जास्त झाली आहे. एकट्या अमेरिकेत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 70 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. त्यामध्ये, गेल्या 24 तासांत 2,333 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. 

जॉन हॉप्किन्गस युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 24 तासात 2333 जणांचा जीव गेला आहे. तर जगभरात आत्तापर्यंत 2,55,176 जण मृत्युमुखी पडले आहेत. जगातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 36,90,863 पर्यंत पोहोचली आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार माजला असून याचा सर्वाधिक विपरीत परिणाम युरोप आणि अमेरिकेत जाणवत आहे. अमेरिकेते आत्तापर्यंत 70,761 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, 12,21,655 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. सुदैवाची बाब म्हणजे येथील 1,89,164 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जवळपास 75 लाखांपेक्षा अधिक रुग्णांची आतापर्यंत तपासणी झाली आहे. कोरोना प्रादुर्भावाचा सर्वाधिक परिणाम झालेल्या देशांमध्ये अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

अमेरिकेमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेसह इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेखालोखाल इटलीमध्ये 9315 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये मृतांचा आकडा 25 हजार 428 वर गेला आहे. फ्रान्समध्ये कोरोना व्हायरसमुळे 25 हजार 201 जणांचा तर ब्रिटनमध्ये 28 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, देशभरात गेल्या चोवीस तासांत 3900 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंतची ही दिवसभरातील सर्वाधिक आकडेवारी असल्याने केंद्र सरकारची चिंता आणखी वाढली आहे. याशिवाय दिवसभरात कोरोनाग्रस्त 195 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी काही राज्यांकडून रुग्ण व मृत्यू होणाऱ्यांची माहिती देण्यास विलंब होत असल्याने हा आकडा वाढलेला दिसतो, असे मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले. काही भागांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. जिथे रुग्ण जास्त आहेत तेथे मृत्यूदरही जास्त होण्याची भीती आहे. मात्र, तूर्त भारतात कोरोनाचा प्रसार मर्यादित असल्याचा पुनरुच्चार अगरवाल यांनी केला.
 

CoronavirusNews: 'उद्धव ठाकरेंच्या कामाचं आम्हीच कौतुक करत होतो, आता सगळं वाया गेलं'

पुण्यातील गोल्डमॅनचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन

 

Web Title: The death toll in the United States has crossed 70,000, with a worldwide outbreak of corona MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.