पाकिस्तानात भीषण रेल्वे अपघात, 16 प्रवाशांचा मृत्यू
By Admin | Updated: November 3, 2016 14:07 IST2016-11-03T14:07:52+5:302016-11-03T14:07:52+5:30
पाकिस्तानमधील कराची येथे भीषण रेल्वे अपघात झाला असून 16 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 40 प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत.

पाकिस्तानात भीषण रेल्वे अपघात, 16 प्रवाशांचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
इस्लमाबाद, दि. 3 - पाकिस्तानमधील कराची येथे भीषण रेल्वे अपघात झाला असून 16 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 40 प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत. झकारिया एक्स्प्रेस आणि फरीद एक्स्पेस यांची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. दोन महिन्यांमधील हा दुसरा भीषण अपघात आहे. ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
अपघातानंतर रेल्वे सेवा पुर्णपणे बंद करण्यात आली होती. मृतांचा आकडा सध्या 16 असून तो वाढण्याची शक्यता आहे असं जावेन अकबर रियाज या पोलीस अधिका-याने सांगितलं आहे. जखमींना कराचीमधील जिन्नाह रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आलं आहे.
सप्टेंबर महिन्यात पंजाबमधील मुलतानमध्ये झालेल्या ट्रेन अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता, तर 93 प्रवासी जखमी झाले होते.