शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही बाप-लेकीनं सोडली नाही एकमेकांची साथ, निर्वासित कुटुंबाची वाताहत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 04:57 IST

व्हॅलेरिया ही अवघी दोन वर्षांची मुलगी खूपच चुणचुणीत होती. चेहऱ्यावर सतत हास्य, नाचायची आवड आणि आई-वडिलांची एकुलती एक मुलगी.

न्यूयॉर्क  - व्हॅलेरिया ही अवघी दोन वर्षांची मुलगी खूपच चुणचुणीत होती. चेहऱ्यावर सतत हास्य, नाचायची आवड आणि आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. पण आपल्या देशात रोजगार नाही, तो मिळण्याची शक्यता नाही, हे लक्षात आल्यानं व्हॅलेरियाचे वडील आॅस्कर अल्बर्टो मार्टिन यांनी आपली मोटरसायकल विकली आणि त्यांनी पत्नी तानिया व मुलगी व्हॅलेरिया यांच्यासह एल सेल्वाडोर सोडून अमेरिकेत जायचं ठरवलं.अर्थातच अधिकृत प्रवेश मिळणं शक्य नव्हतं. त्यामुळे मिळेल त्या वाटेनं ते व पत्नी आपल्या मुलीला घेऊ न निघाले. मेक्सिकोमधील रियो ग्रँड नदी ओलांडली की ते अमेरिकेत प्रवेश करू शकले असते.नदी पार करताना मार्टिन यांनी मुलीला पाठीवर घेतलं. टी शर्टच्या आतमध्ये तिला सुरक्षित ठेवलं. पण त्यांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही आणि ते आणि मुलगी नदीत बुडाले. पत्नी तानिया मात्र वाचली. मरण पावलेले बाप आणि मुलगी नदीच्या किनारी एकमेकांच्या शेजारी असल्याचं छायाचित्रं आता सर्वत्र प्रसारित झालं आहे. त्यात व्हॅलेरिया आपल्या वडिलांच्या टी शर्टच्या मागील बाजूला असल्याचं दिसत आहे. मृत्यूनंतरही मार्टिन यांनी मुलीला आपल्यापासून दूर केलं नाही.हे छायाचित्र प्रसारित होताच सेल्व्हाडोर व मेक्सिकोमध्ये अमेरिकेविषयी संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यांना अधिकृत प्रवेश मिळणं शक्य असतं, तर त्यांनी हा मार्ग अवलंबलाच नसता, अशा प्रतिक्रिया अमेरिकेतही व्यक्त होत आहेत. निर्वासितांना देशात येऊ च द्यायचं नाही, या ट्रम्प यांच्या धोरणामुळे हे घडलं, अशी अमेरिकन लोकांचीही भावना आहे. (वृत्तसंस्था)ट्रम्प काय म्हणाले?इतका संताप सर्व बाजूंनी व्यक्त झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनीही या प्रकाराबद्दल दु:ख व्यक्त केलं. असं छायाचित्र पाहणं आपल्यालाही आवडत नाही, असं त्यांनी म्हटलं. मार्टिन हा सर्वात चांगला बाप असणार, याची मला खात्री आहे, असंही ते म्हणाले आहेत.

टॅग्स :United StatesअमेरिकाDeathमृत्यू