अमली पदार्थांच्या सहा गुन्हेगारांना इंडोनेशियात देहदंड
By Admin | Updated: January 19, 2015 02:36 IST2015-01-19T02:36:40+5:302015-01-19T02:36:40+5:30
अमली पदार्थांच्या गुन्ह्यातील सहा जणांना क्षमा करावी अशी विनंती करूनही इंडोनेशियाने त्यांना गोळ््या घालून ठार मारल्यानंतर ब्राझील व नेदरलँडस्ने त्या देशातील आपापले राजदूत रविवारी माघारी बोलावले.

अमली पदार्थांच्या सहा गुन्हेगारांना इंडोनेशियात देहदंड
जकार्ता : अमली पदार्थांच्या गुन्ह्यातील सहा जणांना क्षमा करावी अशी विनंती करूनही इंडोनेशियाने त्यांना गोळ््या घालून ठार मारल्यानंतर ब्राझील व नेदरलँडस्ने त्या देशातील आपापले राजदूत रविवारी माघारी बोलावले.
शनिवारी मध्यरात्री गोळ््या घालून ठार मारण्यात आलेल्यांमध्ये नायजेरिया, मलावी, व्हिएतनाम, नेदरलँडस्, ब्राझील व इंडोनेशियाच्या गुन्हेगारांचा समावेश आहे. ब्राझीलने आपल्या राजदूताला चर्चा करण्यासाठी मायदेशी बोलावले असून देहदंडाच्या शिक्षेमुळे द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होतील, असे म्हटले.
पाच वर्षे देहदंडाची शिक्षा स्थगित केल्यानंतर इंडोनेशियाने २०१३ मध्ये पुन्हा ही शिक्षा सुरू केली. अमली पदार्थांच्या गुन्ह्यांबद्दल अजिबात दयामाया दाखविणार नसल्याचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी सांगितले.
(वृत्तसंस्था)