अमेरिकेत मुलाच्या हातून सुटलेल्या गोळीत आईचा मृत्यू

By Admin | Updated: April 28, 2016 15:32 IST2016-04-28T15:18:32+5:302016-04-28T15:32:54+5:30

आपल्या अडीच वर्षाच्या मुलाने बंदुकीतून चुकून झाडलेल्या गोळीत पॅट्रीस प्राईस या महिलेचा मृत्यू झाला आहे.

Death of a mother in child custody in America | अमेरिकेत मुलाच्या हातून सुटलेल्या गोळीत आईचा मृत्यू

अमेरिकेत मुलाच्या हातून सुटलेल्या गोळीत आईचा मृत्यू

>ऑनलाइन लोकमत - 
वॉशिंग्टन, दि. 28 - आपल्या अडीच वर्षाच्या मुलाने बंदुकीतून चुकून झाडलेल्या गोळीत पॅट्रीस प्राईस या महिलेचा मृत्यू झाला आहे. गोळी झाडली गेली तेव्हा पॅट्रीस प्राईस कार चालवत होती. सीटच्या खाली असलेली बंदूक मुलाच्या हाती लागली, आणि तिच्यासोबत खेळत असताना त्यातून गोळी झाडली गेली जिने पॅट्रीस प्राईसचा वेध घेतला. गोळी लागल्यानंतर पॅट्रीस प्राईस यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
पॅट्रीस प्राईस आपल्या मुलासोबत घोडा विकत घेण्यासाठी चालली होती. आपली कार चोरी झालेली असल्याने पॅट्रीस प्राईस यांनी आपल्या प्रियकराची गाडी घेतली होती. पॅट्रीस प्राईस यांचा प्रियकर एका सुरक्षा एजन्सीमध्ये कामाला आहे. त्यामुळे त्याने गाडीत बंदूक ठेवलेली होती, याची कल्पना पॅट्रीस प्राईसला नव्हती. सीटखाली ठेवलेली ही बंदूक त्यांच्या मुलाच्या हाती लागली आणि त्यातून सुटलेल्या गोळीने पॅट्रीस प्राईस यांचा मृत्यू झाला. 
गोळीचा आवाज ऐकल्यानंतर प्रवाशांनी गाडी थांबवली आणि रस्त्याच्या एका बाजूला नेली. गाडीमध्ये पॅट्रीस प्राईस यांचा एक वर्षाचा मुलगा आणि आईदेखील उपस्थित होती. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता हा प्रकार लक्षात आला. गाडीमध्ये पॅट्रीस प्राईस यांच्या प्रियकराचा बेल्ट सापडला आहे ज्यावर सुरक्षा एजन्सीचं नाव आहे. पोलिसांना मागच्या सीटवर बंदूकही सापडली आहे. 
 

Web Title: Death of a mother in child custody in America