डब्लू डब्लू ई रेसलर ते पॉर्न स्टार प्रवास करणा-या च्यानाचा मृत्यू

By Admin | Updated: April 21, 2016 14:32 IST2016-04-21T14:32:17+5:302016-04-21T14:32:17+5:30

वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट ते पॉर्न कलाकार असा प्रवास करणारी जोआन लॉरर ऊर्फ च्याना बुधवारी कॅलिफोर्नियामधील रहात्या घरी मृतावस्थेत आढळली.

The death of the man who travels from WWE to Wrestler to a porn star | डब्लू डब्लू ई रेसलर ते पॉर्न स्टार प्रवास करणा-या च्यानाचा मृत्यू

डब्लू डब्लू ई रेसलर ते पॉर्न स्टार प्रवास करणा-या च्यानाचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत 

न्यूयॉर्क, दि. २१ - वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट ते पॉर्न कलाकार असा प्रवास करणारी जोआन लॉरर ऊर्फ च्याना बुधवारी कॅलिफोर्नियामधील रहात्या घरी मृतावस्थेत आढळली. जोआनचा मृत्यू अनेकांसाठी धक्का आहे. च्याना घरचा फोन उचलत नसल्यामुळे तिचा मित्र तिला भेटण्यासाठी घरी आला. तेव्हा च्यानाचा मृत्यू झाल्याचे समजले. 
 
आजचे डब्लूडब्लूई वर्ल्ड रेसलिंग फेडरेशन (डब्लू डब्लू एफ) असताना १९९७ मध्ये च्यानाने रेसलिंगमध्ये पदार्पण केले. डब्लू डब्लू ई चा फड गाजवताना च्यानाने धोकादायक रेसलर म्हणून ओळखल्या जाणा-या पॉल मायकल लिव्हीसक्यू उर्फ ट्रीपल एच बरोबर युती केली होती. डब्लू डब्लू ई मध्ये तिने २००१ साली महिला चॅम्पियनशिपचा किताब जिंकला. २३१ दिवसांसाठी ती चॅम्पियन होती. 
 
१९९९ मध्ये आंतरखंडीय चॅम्पियनशिपचा किताब जिंकून तिने इतिहास रचला. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला होती. १९९९ आणि त्यानंतर सन २००० तिने हा किताब जिंकला. १९९७ ते २००१ असे डब्लू डब्लू ई मध्ये नाव कमावल्यानंतर च्याना च्याना मॉडलिंग आणि शरीरसौष्ठवाकडे वळली. तिने पॉर्न चित्रपटातही काम केले. प्लेबॉय मॅगझिनमध्येही तीचे फोटो प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर ती काही रिअॅलिटी शो मध्येही सहभागी झाली होती.    
 
                         
 

Web Title: The death of the man who travels from WWE to Wrestler to a porn star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.