शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

युद्धनौका बुडवण्यापूर्वीच इराणने मागितला होता भारताचा आसरा; कोचीमध्ये इराणच्या दुसऱ्या जहाजाला एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 23:22 IST

अमेरिकेने इराणची युद्धनौका बुडवली, भारताकडून १८३ इराणी सैनिकांना अभय

India Helps Iranian Ship: एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यात महाभीषण युद्ध सुरू असताना, अरबी समुद्रात भारताने आपल्या अतिथी देवो भव या परंपरेचे दर्शन घडवले आहे. अमेरिकेने इराणचे आयआरआयएस देना ही युद्धनौका समुद्रात बुडवल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच, भारताने इराणच्या दुसऱ्या एका युद्धपोताला आणि त्यातील १८३ क्रू मेंबर्सना कोचीमध्ये आश्रय दिला आहे.

गेल्या महिन्यात भारतीय नौदलाच्या मिलन या बहुराष्ट्रीय युद्धसरावात सहभागी होण्यासाठी इराणचे आयआरआयएस देना आणि आयआरआयएस लावन ही दोन जहाजे भारतात आली होती. ४२ युद्धनौका आणि १८ मित्रदेशांच्या सहभागासह रंगलेल्या या सरावानंतर दोन्ही जहाजे परतीच्या प्रवासाला निघाली.

आयआरआयएस देनावर अमेरिकेचा हल्ला

२८ फेब्रुवारीच्या सुमारास श्रीलंकेच्या दक्षिणेला हिंद महासागरात अमेरिकेच्या एका पाणबुडीने आयआरआयएस देनावर टॉरपेडोने हल्ला केला. अवघ्या काही मिनिटांत हे जहाज समुद्रात बुडाले. दुसऱ्या महायुद्धानंतर एखाद्या शत्रूचे युद्धपोत टॉरपेडोने बुडवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा पेंटागनने केला आहे. या हल्ल्यात इराणच्या ८७ खलाशांना जलसमाधी मिळाली. इराणने या घटनेला वॉर क्राईम म्हटले आहे, कारण हे जहाज विनाशास्त्र सरावासाठी आले होते.

भारताची भूमिका; युद्धाच्या काळात मैत्रीचा हात

ज्या वेळी आयआरआयएस देनावर हल्ला झाला, त्याच काळात इराणचे दुसरे जहाज आयआरआयएस लावन मध्ये तांत्रिक बिघाड झाला. इराणने तातडीने भारताशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. भारताने मानवतावादी दृष्टिकोनातून १ मार्च रोजी या जहाजाला कोची बंदरात डॉकिंगची (थांबण्याची) परवानगी दिली. ४ मार्च रोजी हे जहाज कोचीमध्ये दाखल झाले.

१८३ इराणी सैनिक सुरक्षित

सध्या या जहाजावरील १८३ क्रू मेंबर्स कोचीमधील भारतीय नौदलाच्या सुविधांमध्ये सुरक्षित आहेत. ज्या वेळी त्यांचे सहकारी समुद्रात प्राण गमावत होते, त्याच वेळी हे १८३ सैनिक भारतीय नौदलाच्या सुरक्षित छायेत होते.

इराणचा संताप आणि अमेरिकेचे शक्तिप्रदर्शन

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी संताप व्यक्त करताना म्हटले की, आयआरआयएस देना हे प्रशिक्षणाचे जहाज होते आणि ते भारताच्या निमंत्रणावरून पाहुणे म्हणून आले होते. अशा निशस्त्र जहाजावर हल्ला करणे हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या हल्ल्याचा व्हिडिओ जारी करून आपल्या ताकदीचे प्रदर्शन केले आहे.

भारतापुढील राजनैतिक पेच

भारताने या युद्धात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असली तरी, इराणच्या सैनिकांना आपल्या तळावर आश्रय देणे हे राजनैतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. एका बाजूला अमेरिकेसोबतची धोरणात्मक भागीदारी आणि दुसरीकडे इराणसोबतचे जुने संबंध, अशा दुहेरी पेचात भारत आपली भूमिका अत्यंत सावधगिरीने बजावत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran sought India's shelter before warship sank; entry in Kochi.

Web Summary : Amid US-Iran tensions, India offered refuge to an Iranian warship and its 183 crew members in Kochi after another Iranian ship was allegedly attacked by the US. India balanced its relations amidst the conflict.
टॅग्स :Iranइराणindian navyभारतीय नौदल