शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 09:16 IST

आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याला पकडण्यासाठी भारतानं दबाव टाकला आहे. दाऊद इब्राहिमचा डावा हात समजला जाणा-या जबीर मोतीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली- गेल्या अनेक वर्षांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम देशाबाहेर पळाला आहे. परंतु त्याचे भारतातल्या अंडरवर्ल्ड माफियांशी असलेले संबंध पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याला पकडण्यासाठी भारतानं दबाव टाकला आहे. दाऊद इब्राहिमचा डावा हात समजला जाणा-या जबीर मोतीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. लंडनच्या चारिंग क्रॉस पोलिसांनी मोतीला शुक्रवारी हिल्टन हॉटेलमधून अटक केली आहे आणि त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं.मोती हा इंग्लंड, यूएई आणि इतर देशांमध्ये दाऊदचं कामकाज सांभाळतो. भारतानं मोतीला अटक करण्याची मागणी केली होती. मोतीवर ड्रग्ज तस्करी, खंडणी आणि इतर गुन्हांमध्ये गंभीर आरोप आहेत. जबीर सिद्दीक ऊर्फ जबीर मोती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू सहकारी आहे. तो दाऊद आणि डी कंपनीसाठी पैशासंबंधित व्यवहार पाहतो. पाकिस्ताननं त्याला नागरिकत्व बहाल केलं आहे. दाऊदची पत्नी महजबीचा सुद्धा त्याच्यावर फार विश्वास आहे. दाऊद सध्या कराचीमधील क्लिफ्टन भागात राहतो.मोती हा मध्य पूर्व देशांसह ब्रिटन, यूरोप, आफ्रिकेमध्ये दाऊदचं काम पाहतो. सूत्रांच्या माहितीनुसार, दाऊदला धंद्यातून झालेला नफा तो दहशतवादी संघटनांना पुरवतो. दाऊदसाठी मोती बनावट भारतीय नोटा, अवैध शस्त्रास्त्रं पुरवठा आणि मालमत्तेसंबंधित व्यवहार पाहतो. कराचीमध्ये त्याचा मोठा बंगला आहे. तो अँटिग्वा व डोमिनिक रिपब्लिकचं नागरिकत्व घेण्याबरोबरच हंगेरीचा कायमस्वरूपीचं नागरिकत्व घेण्यासाठी प्रयत्नशील होता. जबीरकडे इंग्लंडचा 10 वर्षांचा व्हिसा आहे. 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमPakistanपाकिस्तान