दाऊदचा भाऊ हुमायून याचा मृत्यू

By Admin | Updated: June 24, 2016 19:48 IST2016-06-24T19:48:46+5:302016-06-24T19:48:46+5:30

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा छोटा भाऊ हुमायून याचा पाकिस्तानमधील कराचीत मृत्यू झाला.

Dawood's brother Humayun dies | दाऊदचा भाऊ हुमायून याचा मृत्यू

दाऊदचा भाऊ हुमायून याचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. 24 - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा छोटा भाऊ हुमायून याचा पाकिस्तानमधील कराचीत मृत्यू झाला. हुमायून हा 40 वर्षांचा होता. हुमायून याला कर्करोगाच्या आजारानं ग्रासलं होतं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा दफनविधी कराचीमध्येच होणार आहे.
हुमायून हा पाकिस्तानात दाऊद इब्राहिमसोबतच वास्तव्याला होता. इंटेलिजन्स ब्युरोच्या माहितीनुसार हुमायून हा कोणत्याही गँगमध्ये सहभागी नव्हता. तो फक्त दाऊदचा कराची आणि दुबईमधला रिअल इस्टेटचा व्यवसाय आणि हॉटेल सांभाळत होता.
दाऊद याला 6 भाऊ आणि 5 बहिणी आहेत. दाऊदचा मोठा भाऊ शाबीर याचा 1983मध्ये पठाण गँग हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्याचा दुसरा भाऊ नूरा याचा किडनी निकामी झाल्यानं 2011मध्ये मृत्यू झाला होता.

दाऊदचा भाऊ अनिस आणि मुश्ताकीन हेसुद्धा दाऊदसोबत कराचीमध्येच राहतात. दाऊद इब्राहिमचा एक भाऊ इक्बाल हा मुंबईत राहतो. दाऊदच्या दोन बहिणी शहीदा आणि हसीना यांचाही मृत्यू झाला आहे.

Web Title: Dawood's brother Humayun dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.