शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Mehwish Hayat: दाऊदच्या 'गर्लफ्रेंडला' पाकिस्तानचा पंतप्रधान व्हायचय; इम्रान खानही आवडू लागलेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 16:26 IST

Mehwish Hayat Also like Imran Khan, PTI Party: महविश हयातला एक प्रश्न विचारण्यात आला होता. यामध्ये पुढील निवडणुकीमध्ये इम्रान खानला राजकीय आव्हान देत आहात का असे विचारले गेले. यावर मी त्यांना आव्हान देऊ इच्छित नाही. मात्र, नंतर कोणाला ना कोणाला तरी त्यांची जागा घ्यावी लागणार आहे,असे ती म्हणाली आणि चर्चा सुरु झाली.

इस्‍लामाबाद: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) ची कथित गर्लफ्रेंड आणि पाकिस्तानी अभिनेत्री महविश हयातला (Mehwish Hayat) आता पाकिस्तानचापंतप्रधान (Pakistan PM) व्हायची इच्छा आहे. एवढेच नाही तर महविश ही पंतप्रधानइम्रान खान (Imran khan) आणि त्यांचा पक्ष पीटीआयचा खूप प्रभाव पडला आहे. महविशच्या दाव्यानुसार जेव्हापासून इम्रान खान सत्तेत आलेत, तेव्हापासून पाकिस्तानमध्ये खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत. जर क्रिकेटर पंतप्रधान बनू शकतो तर अभिनेत्रीदेखील पंतप्रधान बनू शकते, असे तिचे म्हणणे आहे. (Mehwish Hayat has proved her potential as an actor and an influencer. she want to became PM of Pakistan.)

महविश हयातला एक प्रश्न विचारण्यात आला होता. यामध्ये पुढील निवडणुकीमध्ये इम्रान खानला राजकीय आव्हान देत आहात का असे विचारले गेले. यावर मी त्यांना आव्हान देऊ इच्छित नाही. मात्र, नंतर कोणाला ना कोणाला तरी त्यांची जागा घ्यावी लागणार आहे. यावेळी पंतप्रधान प्रदाची मी दावेदार असेन असे ती म्हणाली. जेव्हापासून पीटीआयची सत्ता आली आहे समाजाच्या विचारांमध्येही बदल झाले आहेत. 

देशात सकारात्मक बदल घडविण्याचा माझा विचार आहे. आता हे तर वेळच सांगेल की माझे स्वप्न संसदेत जाऊन पूर्ण होईल की नवीन पक्ष काढून, असे संकेतही तिने दिले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री महविश हयात आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिममध्ये प्रेमसंबंध सुरु असल्याचे वृत्त आले होते. तसेच हे बाहेर आल्याने दाऊद चिडला असून हे बाहेर कसे लीक झाले याचा शोध घेत असल्याचा दावा देखील करण्यात आला होता. यावर अभिनेत्रीने दाऊदशी काही संबंध नसल्याचा खुलासा केला होता. 

महविश ही दाऊदपेक्षा 27 वर्षे छोटी आहे. तसेच दाऊदची हीच सर्वात मोठी कमजोरी आहे. या दोघांमधील प्रेमसंबंधांची चर्चा गेल्या वर्षीपासूनच सुरु झाली होती, जेव्हा महविशला 'तमगा-ए-इम्तियाज' या नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. यावर प्रश्नही उठू लागले होते. दाऊत हा महविशचे एक आयटम साँग पाहून भाळला होता. यानंतर दाऊदने महविशला मोठमोठ्या फिल्म मिळवण्यास मदत केली होती.

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमImran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानprime ministerपंतप्रधान