औषधांमुळे महिलांची नैसर्गिक प्रसूती क्षमता धोक्यात

By Admin | Updated: May 25, 2015 00:55 IST2015-05-25T00:55:51+5:302015-05-25T00:55:51+5:30

प्रसूतीवेदना होत असताना दिल्या जाणाऱ्या औषधांवर गर्भवती महिला जास्त अवलंबून राहत असून, ही औषधे व सिझेरियन शस्त्रक्रिया

Dangers threaten women's natural delivery ability | औषधांमुळे महिलांची नैसर्गिक प्रसूती क्षमता धोक्यात

औषधांमुळे महिलांची नैसर्गिक प्रसूती क्षमता धोक्यात

लंडन : प्रसूतीवेदना होत असताना दिल्या जाणाऱ्या औषधांवर गर्भवती महिला जास्त अवलंबून राहत असून, ही औषधे व सिझेरियन शस्त्रक्रिया यामुळे महिलांची नैसर्गिक प्रसूतीची क्षमता कमी होत चालली असल्याचा दावा आघाडीच्या डॉक्टरने केला आहे.
डॉ. मिचेल ओडंट या फ्रेंच डॉक्टरच्या म्हणण्यानुसार नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी गरज असणारे हार्मोन गर्भवती महिलांच्या शरीरात तयार होणे बंद होण्याच्या मार्गावर आहे. कारण डॉक्टर हे हार्मोन ड्रिपने महिलांना दीर्घकाळ देतात. नैसर्गिकरीत्या प्रसूतीचे हार्मोन तयार न झाल्यामुळे महिलांची स्तनपान देण्याची क्षमताही संपत आहे.
डॉ. मिचेल ओडंट यांचे ‘डु वुई नीड मिडवाईव्ह्ज?’ (आपल्याला दायांची गरज आहे काय?’) हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले असून, त्यात ते म्हणतात, महिलांची नैसर्गिकरीत्या मूल जन्माला घालण्याची क्षमता संपत आहे. नैसर्गिकरीत्या प्रसुतींची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे.
नैसर्गिक प्रसूतीची संख्या कमी होण्यामागे आॅक्सिटोसिन या हार्मोनची कमतरता हे मोठे कारण आहे. आॅक्सिटोसिन हे हार्मोन कृत्रिमरीत्या तयार करून ते महिलांना दिले जात असल्याने नैसर्गिकरीत्या आॅक्सिटोसिन तयार होतच नाही.
प्रसूतीवेदना होण्यासाठी आॅक्सिटोसिन हार्मोन लागते, याच हार्मोनमुळे महिलांना आपल्या मुलाबद्दल प्रेम वाटू लागते. आई व मूल यांच्यात अतूट प्रेमाचा बंध निर्माण होतो व मुलाला स्तनपान देण्यासाठीही हेच हार्मोन प्रेरित करते, पण सिझेरियन शस्त्रक्रियामुळे बहुतांश महिलांना ड्रीपद्वारे हे हार्मोन दिले जाते. त्यामुळे नैसर्गिकरीत्या हे हार्मोन स्रवण्याची क्षमता धोक्यात आली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Dangers threaten women's natural delivery ability