Dangerous exotic animal markets reopen in the heart of China's coronavirus birthplace | ज्या ठिकाणाहून कोरोना व्हायरस पसरला चीनमधील वुहान शहरात पुन्हा जिवंत प्राण्यांचा बाजार सुरू झाला

ज्या ठिकाणाहून कोरोना व्हायरस पसरला चीनमधील वुहान शहरात पुन्हा जिवंत प्राण्यांचा बाजार सुरू झाला

जिवंत प्राण्यांचा बाजार कोरोना विषाणू फैलावण्याचे मुख्य कारण बनले होते. त्यानंतर चीनवर जगभरातून टीका करण्यात आली होती. हळुहळु लॉकडाऊन हटवत तेथील जनजीवन पूर्ववत होत आहे. अशात जिवंत जनावरांची विक्री करणाऱ्या लोकांनी आपली दुकाने परत सुरू केली आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ह्युवानान सीफूड बाजारातून प्रथम झाला. कोरोना व्हायरस पसरल्यानंतर चीन प्रशासनाने वुहानच्या मार्केटमध्ये छापा मारला होता आणि 40 हजार प्राण्यांना ताब्यात घेतले होते. यात साप, कुत्रे, ससे, गाढव इत्यादींचा समावेश होता. यानंतर 1 जानेवारी रोजी हा बाजार बंद करण्यात आला.

धक्कादायक म्हणजे  ज्या ठिकाणाहून कोरोना व्हायरस पसरला चीनमधील वुहान शहरात पुन्हा जिवंत प्राण्यांचा बाजार सुरू झाला आहे. वटवाघुळातून खवल्या मांजरात आणि खवल्या मांजरातून मनुष्यात पसरलेल्या या व्हायरसमुळे महामारी आल्यावरही चीनमधील लोक अजूनही असे प्राणी खाणं टाळत नाहीयेत. चीन सरकारने जिवंत प्राण्यांच्या विक्रीवर बॅन लावला होता पण चीनी नागरिक हे प्राणी खाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्याची विक्री करतच होते. 


हा बाजार सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. चीनमध्ये कोरोनाने थैमान घातल्यानंतर अनेकांना मृत्यूमुखी पाडले. चीनमुळेच कोरोनाचा प्रसार होण्यास सुरूवात झाली त्याचा परिणाम आज अख्खे जग भोगत आहे.अख्या जगाला आज कोरोनाच्या संकटाला समोरे जावे लागत आहे. असे असूनही चीनने यातून धडा घेतला नाही. पुन्हा एकदा प्राण्यांचा जीव घेत स्वतःची पोट भरणारा चीन  आगामी काळात आणखीन भयंकर संकटाला आमंत्रण देणार असेच दिसतेय.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dangerous exotic animal markets reopen in the heart of China's coronavirus birthplace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.