'टायगर टेम्पल'मध्ये वाघांच्या 40 बछड्यांचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: June 1, 2016 18:29 IST2016-06-01T18:19:52+5:302016-06-01T18:29:32+5:30
थायलंडमध्ये असलेल्या टायगर टेम्पल परिसरात वाघांच्या 40 बछड्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.

'टायगर टेम्पल'मध्ये वाघांच्या 40 बछड्यांचा संशयास्पद मृत्यू
ऑनलाइन लोकमत
बॅंकॉक, दि. 1 - थायलंडमध्ये असलेल्या 'टायगर टेम्पल' परिसरात वाघांच्या 40 बछड्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.
पश्चिमेकडील कांचनाबुरी प्रांतात असलेल्या 'टायगर टेम्पल' परिसरात वाघांच्या बछड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती येथील वन अधिका-यांनी दिली. त्यामध्ये एकूण 40 बछड्यांचा समावेश आहे. त्यांचा मृत्यू संशयास्पद झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यासंदर्भात तपास सुरु असल्याचे येथील पोलिसांनी सांगितले.
'टायगर टेम्पल' हे वाघांसाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी विदेशातून अनेक पर्यटक येतात.