डमास्कसमध्ये भीषण कार स्फोट; 20 ठार

By Admin | Updated: July 3, 2017 03:08 IST2017-07-03T03:08:54+5:302017-07-03T03:08:54+5:30

दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या भीषण कार स्फोटात २0 जण ठार झाले तर अनेक महिला आणि बालके जखमी झाले. ही घटना

Dangerous car explosion in Damascus; 20 killed | डमास्कसमध्ये भीषण कार स्फोट; 20 ठार

डमास्कसमध्ये भीषण कार स्फोट; 20 ठार

>ऑनलाइन लोकमत
बैरुत/डमास्कस, दि. 3 - दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या भीषण कार स्फोटात २0 जण  ठार झाले तर अनेक महिला आणि बालके जखमी झाले. ही घटना सीरियाची राजधानी असलेल्या डमास्कस येथे रविवारी घडली. 
       डमास्कसमधील बाब तौमा भागात हा भीषण स्फोट झाला. या हल्ल्यात २0 जण ठार झाले.  रहदारीच्या भागात   रविवारी तीन कार विस्फोट करुन आणण्याचे कारस्थान दहशतवाद्यांनी रचले होते.  सुरक्षा सैनिकांनी अन्य दोन कारचा शोध घेऊन, त्यातील विस्फोटके निकामी केली. अन्यथा या हल्ल्याची तीव्रता अत्यंत भीषण ठरली असती, असे सुरक्षा अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.  गत मार्चमध्ये सीरियात झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर हा पहिलाच दहशतवादी हल्ला आहे.  या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याच दहशतवादी संघटनेने घेतली नाही. 

Web Title: Dangerous car explosion in Damascus; 20 killed