America Iran War: एकीकडे युद्धाची तीव्रता वाढत असताना इराणने अमेरिकेचे एक लढाऊ विमान (एफ-१५ इ स्ट्राइक ईगल) पाडल्यानंतर बेपत्ता असलेल्या वैमानिकाचा अमेरिकेने शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर इराणने आपल्या नागरिकांना 'शत्रूचा वैमानिक' शोधून त्याला पोलिसांच्या हवाली करण्याचे आवाहन केले असून, १० अब्ज इराणी तोमान (सुमारे ५५ लाख रुपये) बक्षीस देण्याचेही आश्वासन दिले आहे. परंतु, अमेरिकन सैन्याने शत्रूच्या भूमीतून सुरक्षित बाहेर काढल्याचे म्हटले जात आहे.
२४ तासांच्या अनिश्चिततेनंतर बेपत्ता झालेल्या पायलटला अमेरिकेने अखेर शोधून काढले. या मोहिमेने अमेरिकी सैन्य अशा प्रकारच्या कारवाया किती यशस्वीपणे पार पाडते, हे पुन्हा एकदा सिद्ध केले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकी सैन्याची प्रशंसा केली. सुटका केलेला वैमानिक सुरक्षित असून, त्याला इराणमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिली आहे.
अमेरिकन पायलट बचाव मोहीम फत्ते
ही बचाव मोहीम एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशीच घडली. पायलटपर्यंत पोहोचण्यासाठी अमेरिकेच्या विशेष दलाच्या बचाव पथकांना शत्रूच्या भूमीवर जोरदार गोळीबाराचा सामना करावा लागला. सुटका करण्यात आलेला पायलट हा अमेरिकेच्या हवाई दलातील शस्त्र प्रणाली अधिकारी आहे. कुवैतवरून झेपावणाऱ्या अमेरिकन विमानाला इराणने लक्ष्य केले आणि ते कोसळले. याचे पायलट मात्र सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाले. यात एक पायलट सापडला, तर दुसरा बेपत्ता झाला होता.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात आपली भूमिका आणखी कठोर केली असून, ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. इराणकडे तडजोड करण्यासाठी किंवा होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी' फक्त दोन दिवस आहेत, अन्यथा 'महाभयंकर संकटा'ला सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला.
Web Summary : After being shot down by Iran, an American pilot was rescued in a daring mission. Facing heavy gunfire, US Special Forces successfully retrieved the pilot from enemy territory. President Trump praised the operation, issuing a 48-hour ultimatum to Iran regarding the Strait of Hormuz.
Web Summary : ईरान द्वारा मार गिराए जाने के बाद, एक अमेरिकी पायलट को एक साहसी मिशन में बचाया गया। भारी गोलीबारी का सामना करते हुए, अमेरिकी विशेष बलों ने पायलट को दुश्मन के इलाके से सफलतापूर्वक निकाला। राष्ट्रपति ट्रम्प ने ऑपरेशन की सराहना की, और होर्मुज जलडमरूमध्य के संबंध में ईरान को 48 घंटे का अल्टीमेटम जारी किया।