‘ड’ जीवनसत्त्वाच्या लाभाचा पुरावा नाही
By Admin | Updated: May 18, 2015 23:54 IST2015-05-18T23:54:14+5:302015-05-18T23:54:14+5:30
तुटलेले हाड जोडण्यासाठी सहाय्यकारी ‘व्हिटॅमिन डी’ अन्य कोणत्याही परिस्थितीत लाभकारी नाही. आवश्यक नसतानाही याचे डोस दिले जातात.

‘ड’ जीवनसत्त्वाच्या लाभाचा पुरावा नाही
मेलबर्न : तुटलेले हाड जोडण्यासाठी सहाय्यकारी ‘व्हिटॅमिन डी’ अन्य कोणत्याही परिस्थितीत लाभकारी नाही. आवश्यक नसतानाही याचे डोस दिले जातात. ड जीवनसत्त्वाने आरोग्याला लाभ होतो असा पुरावा नसल्याचा निष्कर्ष निघाला आहे.
आॅस्ट्रेलियातील दोन संशोधकांनी यासंदर्भात अभ्यास केला. ड जीवनसत्त्वाची कमतरता व कर्करोग, मधुमेह तथा संसर्ग यातील परस्पर संबंध स्थापित करण्यासाठी येत्या काळातही आणखी अभ्यास करण्याची गरज आहे, असे या संशोधकांनी सांगितले. रॉयल पर्थ रुग्णालयातील रोग निदान सल्लागार आणि एंडोक्राइनोलॉजिस्ट पॉल ग्लेंडनिंग आणि पश्चिम आॅस्ट्रेलिया विद्यापीठातील संशोधक गेरार्ड च्यू यांनी हा अभ्यास केला. (वृत्तसंस्था)
ग्लेंडनिंग यांनी सांगितले की, ‘ड जीवनसत्त्वाच्या अनावश्यक मात्रेची चौकशी केली जाईल आणि कमतरता असलेल्यांसाठी अनावश्यकरीत्या उपचार केला जात असेल, अशा घटनांचा अभ्यास केला जाऊ शकतो. आपल्या अभ्यासात ‘ड जीवनसत्त्वाचे काही स्पष्ट लाभही आढळून आले आहेत, असे ते म्हणाले. ‘ड जीवनसत्त्वासोबतच कॅल्शियमही तुटलेले हाड जोडण्यासाठी लाभकारी ठरते.