ग्रीसच्या निवडणुकीत सिप्रॅस अनपेक्षित विजयी
By Admin | Updated: September 21, 2015 23:19 IST2015-09-21T23:19:04+5:302015-09-21T23:19:04+5:30
ग्रीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत रविवारी डाव्या विचारांचे अलेक्सिस सिप्रॅस यांनी अनपेक्षितपणे यश मिळविले. ग्रीसची अर्थव्यवस्था खूपच संकटांतून वाटचाल

ग्रीसच्या निवडणुकीत सिप्रॅस अनपेक्षित विजयी
अथेन्स : ग्रीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत रविवारी डाव्या विचारांचे अलेक्सिस सिप्रॅस यांनी अनपेक्षितपणे यश मिळविले. ग्रीसची अर्थव्यवस्था खूपच संकटांतून वाटचाल करीत असताना सिप्रॅस यांना ती सावरण्यासाठी सत्ता मिळाल्याचे बोलले जात आहे.
अलेक्सिस सिप्रॅस हे युरोपचे अतिशय स्पष्टवक्ते राजकीय नेते आहेत. ग्रीसला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी जी मदत हवी होती तिच्या बदल्यात काटकसरीचे उपाय अवलंबिले पाहिजेत अशी मागणी सिप्रॅस यांनी केली होती व त्यामुळे त्यांना गेल्या महिन्यात पक्षातून पुराणमतवादी नेत्यांनी काढूनही टाकले होते.
सहा वर्षांत ग्रीसने ५ सार्वत्रिक निवडणुकांना तोंड दिले आहे. या पार्श्वभूमीवर सिप्रॅस यांनी देशाला स्थैर्याच्या नव्या टप्प्यावर नेण्याचे आश्वासन विजयानंतर केलेल्या भाषणात दिले. (वृत्तसंस्था)