मध्य पूर्वेतील युद्धामुळे संपूर्ण जगाला विविध संकाटाचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर क्युबातील ऊर्जा संकट अधिकच गडद झाले असून, ११ दशलक्ष लोक अंधारात आहेत. राजधानी हवानासह देशाच्या कानाकोपऱ्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तसेच वीजपुरवठ्यासह अत्यावश्यक सेवांवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सोमवारी झालेल्या या ब्लॅकआउटमुळे केवळ घरांमध्येच नव्हे, तर रुग्णालये, वाहतूक व्यवस्था आणि अत्यावश्यक सेवांवरही गंभीर परिणाम झाला आहे. वीज नसल्याने पाणीपुरवठाही ठप्प झाली असून मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवांमध्येही मोठे व्यत्यय येत आहेत. लहान व्यवसाय आणि मोठ्या उद्योगांना टाळे लागल्याने देशाचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. बहुतांश घरांमध्ये विजेला पर्यायी व्यवस्था नसल्याने नागरिकांना भीषण उष्णता आणि अंधारात रात्र काढावी लागत आहे.
क्युबाच्या ऊर्जा मंत्रालयाने सोशल मीडियाद्वारे देशातील अनेक भागांत वीज खंडीत झाल्याचे माहिती दिली. मात्र, यामागचे खरे कार त्यांनी स्पष्ट केले नाही. दरम्यान, क्युबातील वीज प्रकल्प दशकां जुने असून त्यांच्या देखभालीचा मोठा अभाव आहे. तेल पुरवठ्यातील व्यत्ययामुळे वीज निर्मिती केंद्रांना आवश्यक इंधन मिळत नाहीये. या परिस्थितीला क्युबाने अमेरिकेला जबाबरदार धरले आहे. या निर्बंधांमुळे क्युबाला आंतरराष्ट्रीय बाजारातून तेल खरेदी करणे कठीण झाले आहे.
ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती सुधारण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना आखल्या जात आहेत. सोमवार रात्रीपर्यंत हवानाच्या केवळ ५ टक्के भागातील (सुमारे ४२,००० ग्राहक) वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले आहे. मात्र, उर्वरित देश अजूनही अंधारातच आहे." दरम्यान, क्युबातील हे ऊर्जा संकट केवळ तांत्रिक बिघाड नसून ते तिथल्या ढासळत्या अर्थव्यवस्थेचे प्रतीक बनले आहे. जोपर्यंत इंधनाचा नियमित पुरवठा आणि पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण होत नाही, तोपर्यंत क्युबावरील अंधाराचे हे सावट कायम राहण्याची शक्यता आहे.
Web Summary : Cuba faces a severe energy crisis, leaving 11 million in darkness. Blackouts disrupt hospitals, water, and internet. Decades-old infrastructure, fuel shortages, and US sanctions exacerbate the situation. Emergency measures are underway, but the crisis reflects Cuba's economic struggles.
Web Summary : क्यूबा गंभीर ऊर्जा संकट का सामना कर रहा है, जिससे 1.1 करोड़ लोग अंधेरे में हैं। बिजली कटौती से अस्पताल, पानी और इंटरनेट बाधित। दशकों पुराने बुनियादी ढांचे, ईंधन की कमी और अमेरिकी प्रतिबंधों ने स्थिति को और खराब कर दिया है। आपातकालीन उपाय जारी हैं, लेकिन संकट क्यूबा के आर्थिक संघर्षों को दर्शाता है।