शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

येमेन युद्धासाठी क्राउन प्रिन्सने केली वडिलांची खोटी सही; माजी सौदी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 19:47 IST

सौदी अरेबियाच्या माजी अधिकाऱ्याने क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यावर येमेनच्या युद्धाबाबत गंभीर आरोप केले आहेत.

Crown Prince Mohammed bin Salman : येमेन युद्धासंदर्भात सौदीच्या एका माजी अधिकाऱ्याने धक्कादायक दावा केला आहे. येमेन युद्धासाठी क्राउन प्रिन्सने राजाची बनावट स्वाक्षरी केल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी शाही आदेशावर आपल्या वडिलांची बनावट स्वाक्षरी केली. ज्यामुळे येमेनच्या हुथी बंडखोरांविरुद्ध राज्याचे अनेक वर्षे चाललेले युद्ध सुरू झाले. माजी सौदी अधिकाऱ्याने एका अहवालात केला आहे. सौदी अरेबियाने या अहवालावर अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.

सौदीचे माजी अधिकारी साद अल जबरी यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत कोणताही पुरावा नसताना हा आरोप केला. दुसरीकडे, सौदी साद अल जबरी यांना बदनाम माजी सरकारी अधिकारी म्हणत आली आहे. कॅनडात राहणारे माजी सौदी गुप्तचर अधिकारी अल-जबरी यांचा सौदीसोबत अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. सौदीच्या गृह मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रिन्स मोहम्मदने त्याच्या वडिलांच्या जागी युद्ध घोषित करण्याच्या शाही हुकुमावर स्वाक्षरी केली होती. आम्ही आश्चर्यचकित झालो होतो की या युद्धाच हस्तक्षेप करण्यास परवानगी देणारा शाही हुकूम होता. राजाची मानसिक स्थिती बिघडत चालली होती," अल-जबरी यांनी सांगितले.

येमेनमध्ये गेल्या दशकापासून इराण समर्थित हुथी बंडखोरांविरुद्ध युद्ध सुरू आहे. प्रिन्स मोहम्मदने वचन दिले की युद्ध शक्य तितक्या लवकर संपेल. या युद्धात दीड लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हे युद्ध सुरू झाले तेव्हा प्रिन्स मोहम्मद संरक्षण मंत्री होते. तर अल-जबरी यांनी एकदा क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन नायफसाठी काम केले होते. मुहम्मद बिन नायफ हे १ सप्टेंबर २००१ च्या हल्ल्यानंतर राज्यात अल-कायदाच्या दहशतवाद्यांविरुद्धच्या लढ्यात अमेरिकेचा विश्वासू होता. किंग सलमानने २०१७ मध्ये क्राउन प्रिन्सच्या जागी आपल्या मुलास आणले. त्यानंतर प्रिन्स मोहम्मद बिनने मुहम्मद बिन नायफ यांना नजरकैदेत ठेवले. परदेशात पळून गेल्यानंतर क्राऊन प्रिन्सने नायफ यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता.

सौदीची खरी सत्ता सध्या ३८ वर्षीय प्रिन्स मोहम्मद बिन यांच्या हातात आहे. क्राउन प्रिन्स झाल्यानंतर साद अल-जबरी यांना दिलेल्या अनेक महत्त्वाच्या योजना त्यांनी अंमलात आणल्या आहेत. परंतु त्यांच्यावर मानवी हक्कांचे उल्लंघन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे दडपशाही, फाशीच्या शिक्षेचा व्यापक वापर आणि महिला अधिकार कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्याचे आरोपही करण्यात आले आहेत.

दरम्यान, सौदी अरेबियाच्या राजाला प्रिन्स मोहम्मद बिन यांचे वडील सलमान यांच्यासह किमान ४२ मुले होते. २०११ आणि २०२१ मध्ये, राजाचे दोन पुत्र, जे सौदीचे प्रबळ दावेदार होते, त्यांचा अचानक मृत्यू झाला. यानंतर सलमान यांना सिंहासनाचा वारसा मिळाला. सलमान हे सिंहासनावर बसेपर्यंत प्रिन्स मोहम्मद बिन  यांना कोणी ओळखत नव्हते. ते अज्ञातवासात वाढले आणि सत्तेपासून दूर राहिले. २०१५ मध्ये जेव्हा सलमानला सिंहासनावर बसण्याची संधी मिळाली तेव्हा प्रिन्स मोहम्मद बिन यांना संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आणि त्यांनी देशाला युद्धात नेले. येमेनमधील हुथी चळवळीविरुद्धच्या युद्धात मोहम्मद बिन सलमान यांनी गल्फच्या बाजूचे नेतृत्व केले. त्यांनी पश्चिम येमेनचा बराचसा भाग ताब्यात घेतला आहे.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाCrime Newsगुन्हेगारी