गर्दीत घुसवली टॅक्सी; ८ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 04:00 IST2018-06-18T04:00:51+5:302018-06-18T04:00:51+5:30

मॉस्को शहरातील लाल चौकानजीक पादचाऱ्यांच्या गर्दीत शनिवारी टॅक्सी घुसवल्यामुळे दोन मेक्सिकन नागरिकांसह आठ जण जखमी झाले.

Crowded taxi; 8 injured | गर्दीत घुसवली टॅक्सी; ८ जखमी

गर्दीत घुसवली टॅक्सी; ८ जखमी

मॉस्को : मॉस्को शहरातील लाल चौकानजीक पादचाऱ्यांच्या गर्दीत शनिवारी टॅक्सी घुसवल्यामुळे दोन मेक्सिकन नागरिकांसह आठ जण जखमी झाले. सध्या रशियात जागतिक फूटबॉल स्पर्धा सुरू असून त्यासाठी हे मेक्सिकन आले होते. शहरात राहणारे आणि स्पर्धेसाठी जगातून आलेल्या चाहत्यांची शहराच्या मध्यवर्ती भागात गर्दी झाली असताना हा प्रकार घडला. टॅक्सी चालवणा-याचा परवाना किर्जिस्तानचा असून बहुसंख्य मुस्लिम अललेला किर्जिस्तान हा पूर्वी रशियाचा भाग होता. टॅक्सीचालकाने मी हेतूत: गर्दीत वाहन घुसवले नसल्याचा दावा केला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Crowded taxi; 8 injured