भ्याड! फ्रान्समध्ये लहान मुलांवर चाकू हल्ला; पार्कमध्ये खेळणारी सहा बालके गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 03:29 PM2023-06-08T15:29:35+5:302023-06-08T16:52:22+5:30

आल्प्समधील एका शहरात गुरुवारी हा हल्ला झाला. या हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे, असे फ्रान्सचे अंतर्गत व्यवहार मंत्र्यांनी सांगितले.

Coward! Knife attack on children in France Annecy; Six children playing in the park serious | भ्याड! फ्रान्समध्ये लहान मुलांवर चाकू हल्ला; पार्कमध्ये खेळणारी सहा बालके गंभीर

भ्याड! फ्रान्समध्ये लहान मुलांवर चाकू हल्ला; पार्कमध्ये खेळणारी सहा बालके गंभीर

googlenewsNext

फ्रान्समध्ये माथेफिरुने पार्कमध्ये घुसून लहान मुलांवर चाकूहल्ला केला आहे. यामध्ये प्राथमिक माहितीनुसार सहा बालके गंभीर जखमी झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले आहे. 

आल्प्समधील एका शहरात गुरुवारी हा हल्ला झाला. या हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे, असे फ्रान्सचे अंतर्गत व्यवहार मंत्र्यांनी सांगितले. अॅनेसी शहरातील एका चौकात हे पार्क आहे. तिथे खेळण्यासाठी आलेल्या मुलांवर हा हल्ला झाला आहे, असे गेराल्ड डारमॅनिन यांनी सांगितले. 




स्थानिक आमदार अँटोनी आर्मंड यांनी देखील ट्विट करून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. खेळाच्या मैदानावर मुलांवर झालेला हा भ्याड आणि घृणास्पद असा हल्ला आहे, असे ते म्हणाले. 

Web Title: Coward! Knife attack on children in France Annecy; Six children playing in the park serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.