शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

Covishield Update: कोव्हिशिल्ड घेणाऱ्यांवर महत्वाचे संशोधन, लस किती महिने प्रभावी?; लँसेटने वाढविली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 20:15 IST

Important news for Covishield vaccinated people: लँसेटमध्ये छापून आलेल्या या अहवालात ब्राझील आणि स्कॉटलंड येथून माहिती गोळा करण्यात आली आहे. ओमायक्रॉनच्या संकटात हा अहवाल आल्याने खळबळ उडाली आहे. 

ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझिनेकाच्या कोरोनाविरोधी लस म्हणजेच भारतात सीरम इन्स्टिट्यूट  बनवित असलेली कोव्हिशिल्ड बाबत चिंताजनक अहवाल समोर आला आहे. हा अहवाल लँसेट जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. ओमायक्रॉनच्या संकटात हा अहवाल आल्याने खळबळ उडाली आहे. 

लँसेटमध्ये छापून आलेल्या या अहवालात ब्राझील आणि स्कॉटलंड येथून माहिती गोळा करण्यात आली आहे. या संशोधनात ज्या लोकांनी कोव्हिशिल्डचे दोन डोस घेतले आहेत त्यांना कोरोनाच्या गंभीर संक्रमणापासून वाचण्यासाठी बुस्टर डोसची गरज असल्याचे म्हटले आहे. अॅस्ट्राझिनेकाच्या लशीचे दोन डोस घेतलेले स्कॉटलंडचे 20 लाख आणि ब्राझीलच्या 4.2 कोटी लोकांचा डेटा गोळा करून त्यावर संशोधन करण्यात आले. कोव्हिशिल्ड घेतल्यानंतर लशीचा परिणाम तीन महिन्यांतच कमी होऊ लागतो. या काळात हॉस्पिटलमध्ये भरती होणे आणि मृत्यू होण्याची शक्यता दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यांच्या तुलनेत दुप्पट होते. दुसरा डोस घेतल्याच्या चार महिन्यांनी ही शक्यता तिप्पट होते, असे संशोधकांनी म्हटले आहे. 

ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गचे प्रोफेसर अजीज शेख यांनी म्हटले की, कोरोना महामारीच्या विरोधात लस हे एकमेव हत्यार आहे. मात्र, त्याचा प्रभावीपणा कमी होणे हा चिंतेचा विषय आहे. ज्या लोकांना कोरोनाची लस मिळाली नाही ते आणि लस घेतलेले हळू हळू एकाच पातळीवर येण्याची भीती आहे. या संशोधनाने कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटबाबतच्या शक्यतांना वाढविले आहे. 

याचबरोबर हे संशोधन खूप महत्वाचे असल्याचे म्हणताना शेख म्हणाले, कोरोना लसीचा प्रभाव कधीपासून कमी होतो, हे समजल्याने सरकारांना बुस्टर डोस कधी पासून सुरु करावा याचा निर्णय घेणे सोपे जाईल. या संशोधनानुसार 12 आठवड्यांनी कोरोना लसीचा प्रभाव सुरु होतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस