शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

जगावर कोरोनापेक्षा मोठं संकट येणार?; WHO कडून धोक्याचा इशारा

By कुणाल गवाणकर | Published: December 31, 2020 1:19 PM

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या इशाऱ्यामुळे चिंतेत भर

नवी दिल्ली: जगातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा ८ कोटींच्या पुढे गेला आहे. तर मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १८ लाखांच्या वर गेली आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना दुसरीकडे कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. संपूर्ण जग कोरोना संकटातून बाहेर पडण्याची वाट पाहात असताना जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याचा इशारा दिला आहे. यामुळे काळजीत भर पडली आहे.कोरोनापेक्षा जास्त धोकादायक महामारी येऊ शकते. त्या संकटाचा सामना करण्याची तयारी जगानं करायला हवी. त्यासाठी गांभीर्यानं पावलं उचलायला हवीत, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) दिला आहे. डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख मायकल रेयान यांनी पत्रकार परिषदेत बोलताना नव्या संकटावर भाष्य केलं. त्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.कोरोनाचा विषाणू जगभरात वेगानं पसरला. जगाच्या कानाकोपऱ्यात याचा परिणाम पाहायला मिळाला. मात्र ही महामारी सर्वात मोठी महामारी असेलच असं नाही, असं मायकल रेयान म्हणाले. 'कोरोना विषाणूचं वेगानं संक्रमण झालं. त्याच्या फैलावाचा वेग जास्त आहे. या विषाणूमुळे लाखो लोकांचा जीव गेला. मात्र अन्य रोगांचा विचार केल्यास कोरोनाचा मृत्यूदर कमी आहे,' असं रेयान यांनी सांगितलं.भविष्यात कोरोनापेक्षाही मोठी संकटं येऊ शकतात, असा धोक्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. आपल्याला भविष्यात कोरोनापेक्षा जास्त गंभीर संकटांसाठी तयार राहायला हवं, असं रेयान म्हणाले. कोरोना विषाणूचा सामना करताना वैद्यकीय आघाडीवर जगानं बरीच प्रगती केल्याचं डब्ल्यूएचओचे वरिष्ठ सल्लागार ऐलवॉर्ड म्हणाले. कोरोनावरील लसींचा वापर सुरू झाला आहे. पण भविष्यात येणाऱ्या महामारींच्या दृष्टीनं फारशी तयारी नसल्याचंदेखील त्यांनी सांगितलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना