दिलासादायक, जपानमध्ये कोरोना रूग्णांची संख्या घटली, तर लॉकडाऊनही हटवला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 04:47 PM2020-05-25T16:47:31+5:302020-05-25T16:50:07+5:30

कोरोनाचे संक्रमण रोखण्यास या देशाला यश मिळाले आहे. म्हणूनच इतके दिवस लॉकडाऊनमध्ये असणारा जपान आता कोरोनामुक्त देश बनला आहे.

Covid-19 Pandemic Japan PM Shinzo Abe Lifts State Of Emergency After Decline In Corona Cases-2-SRJ | दिलासादायक, जपानमध्ये कोरोना रूग्णांची संख्या घटली, तर लॉकडाऊनही हटवला

दिलासादायक, जपानमध्ये कोरोना रूग्णांची संख्या घटली, तर लॉकडाऊनही हटवला

Next

दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. सर्वच देशांना या समस्येवर कसं नियंत्रण मिळवायचं हा प्रश्न भेडसावत आहे. अनेक देशातील नागरिक लॉकडाऊनचं काटेकोर पालन करत नाहीत.परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. जपानमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच तिथले पंतप्रधान शिंजो अबे यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे.

जपानमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यास या देशाला यश मिळाले आहे. म्हणूनच इतके दिवस लॉकडाऊनमध्ये असणारा जपानमध्ये आता कोरोनाचे संक्रमण आटोक्यात आले आहे.म्हणूनच पंतप्रधान शिंजो आबे यांनी सोमवारी राष्ट्रीय स्तरावर लागू केलेली आणीबाणी हटविण्याची घोषणा केली. 

लाॅकडाऊनमधील सवलती अंतर्गत जिम, रिटेल दुकाने, रेस्तराँ, बार, सलून, थिएटर, उद्याेग, कार्यालये, धार्मिक स्थळ सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र येथे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे. लॉकडाऊन हटवल्यानंतरही जपानमध्येही नियमांचे कडक पालन करण्यास सुरुवात केली आहे.

 
महत्त्वाचे म्हणजे सोमवारी पहाटेपर्यंत जपानमध्ये कोरोना विषाणूची लागण 16,550 च्या आसपास झाली होती. कोविड -११ च्या संक्रमणामुळे आतापर्यंत ८२० लोकांना जीव गमवावा लागला आहे.


जपानी नागरिक शिस्तीचं पालन करतात. जपानी नागरिक हे परावलंबी नसल्यानं स्वतःची कामं स्वतःचा करतात, त्यामुळे त्यांच्याकडे नोकर वगैरे जास्त  नसतात. तसेच जपानमध्ये स्वच्छतेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तिथे अस्वच्छता खपवून घेतली जात नाही. लहान मुलांना सुट्टीच्या दिवशीही उद्यानांमध्ये सफाई कशी करतात, याचं प्रशिक्षण दिलं जातं. देशातील सरकारच्या प्रत्येक नियमांचे पालन जपानी नागरिक करतात.

Web Title: Covid-19 Pandemic Japan PM Shinzo Abe Lifts State Of Emergency After Decline In Corona Cases-2-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.