पाकचे कोर्टाने दिले माजी पंतप्रधान गिलानींच्या अटकेचे आदेश
By Admin | Updated: August 27, 2015 15:15 IST2015-08-27T14:57:03+5:302015-08-27T15:15:29+5:30
कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी पाकिस्तानी न्यायालयाने माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत.

पाकचे कोर्टाने दिले माजी पंतप्रधान गिलानींच्या अटकेचे आदेश
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २७ - कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी पाकिस्तानी न्यायालयाने माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या अटकेचे आदेश दिले असून गिलानी यांना अटक वॉरंट बजावण्यात आला आहे.
'दि डॉन' या वृत्तपत्रानुसार, ट्रेड डेव्हलपमेंट अॅथॉरिटमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवत फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) नेते गिलानी यांच्याविरोधात चार्जशीट दाखल केली आहे. गिलानी यांच्याव्यतिरिक्त पीपीपीचे दुसरे नेते मखदूम अमिन फहीम यांचाही भ्रष्टाचाराच्या या केसमध्ये समावेश आहे.
याप्रकरणी न्यायालयाने गिलानी व फहीम यांना नोटीस बजावली होती, मात्र त्यांनी कोर्टाच्या नोटीशीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे न्यायालयाने एफआयएला या दोघांविरोधात चलान व आजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याची परवानगी दिली आहे. तसेच या दोघांनाही तत्काळ अटक करण्यात यावी व १० सप्टेंबर रोजी सुनावणीसाठी न्यायालयासमोर हजर करावे असे आदेश पोलिसांना दिले आहे.