शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
4
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
5
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
6
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
7
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
8
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
9
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
10
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
11
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
12
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
13
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
14
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
15
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
16
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
17
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
18
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
19
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
20
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता

काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 11:24 IST

NASA Ax-4 Mission: अ‍ॅक्सियम मिशन ४ अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात हे अंतराळवीर जाणार आहेत. फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवर सर्व तयारी पूर्ण झाली असून चारही अंतराळवीर ड्रॅगन कॅप्सुलमध्ये बसले आहेत.

एक दोनदा नाही तर तब्बल सहावेळा खराब हवामानामुळे पुढे ढकलण्यात आलेली नासाची अंतराळ मोहिम आज सुरु होणार आहे. जवळपास ४१ वर्षांनंतर भारतीय अंतराळवीर अंतराळात जाणार आहे. १४ दिवसांच्या या मोहिमेत वेगवेगळे प्रयोग केले जाणार आहेत. यात इस्रोचा देखील समावेश आहे. 

शुभांशू शुक्लांसोबत अन्य तीन अंतराळवीर देखील असणार आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजता या अंतराळवीरांना घेऊन रॉकेट झेपावणार आहे.  अ‍ॅक्सियम मिशन ४ अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात हे अंतराळवीर जाणार आहेत. फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवर सर्व तयारी पूर्ण झाली असून चारही अंतराळवीर ड्रॅगन कॅप्सुलमध्ये बसले आहेत. सर्व चेक पूर्ण झाले असून स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेट उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. हा प्रवास सुमारे साडे अठ्ठावीस तासांचा आहे. २६ जून रोजी दुपारी साडे चार वाजता हे यान  आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणार आहे. 

या मोहिमेचे नेतृत्व कमांडर पॅगी व्हिटसन या करीत असून, अंतराळवीर शुक्ला पायलट असतील. हंगेरीचा अंतराळीवर टिबोर कपू आणि पोलंडचा स्लोव्होज उझ्नान्स्की विस्निव्हस्की तज्ज्ञ म्हणून सोबत असतील. 

सहा वेळा प्रक्षेपण लांबले

या मोहिमेचे पहिले प्रक्षेपण २९ मे रोजी होणार होते. परंतु, स्पेसएक्सच्या फाल्कन रॉकेटच्या बूस्टरमध्ये द्रव ऑक्सिजन गळतीमुळे प्रक्षेपण लांबले. त्यानंतर विविध कारणांमुळे हे प्रक्षेपण लांबत होते. फ्लोरिडातील ‘नासा’च्या केनेडी अंतराळ केंद्रावरून हे यान प्रक्षेपित केले जाईल. या मोहिमेसाठी भारताने ५५० कोटी खर्च केले आहेत.

Ax-4 मिशन काय आहे?Ax-4 मोहिमेचा मुख्य उद्देश अवकाशात विविध वैज्ञानिक प्रयोग आणि तांत्रिक चाचण्या करणे हा आहे. या अभियानांतर्गत अनेक मोठी कामे केली जाणार आहेत. तेथे सर्व शास्त्रज्ञ सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील जैविक आणि भौतिक विज्ञानाशी संबंधित प्रयोग करतील. यासोबतच तेथे तांत्रिक चाचण्याही घेण्यात येणार आहेत. या काळात नवीन अवकाश तंत्रज्ञान आणि उपकरणांची चाचणी घेतली जाईल. या मोहिमेअंतर्गत पृथ्वीवरील लोकांना अंतराळ विज्ञान आणि संशोधनाबाबत जागरूक केले जाईल.

टॅग्स :NASAनासाisroइस्रो