खूशखबर! आता वृद्धांमध्येही तयार होणार कोरोनाविरोधात इम्युनिटी, 'या' कंपनीच्या लशीला मोठं यश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 10:42 PM2020-08-26T22:42:00+5:302020-08-26T22:50:33+5:30

कंपनीने एक निवेदन जारी करत यासंदर्भात माहिती दिली आहे. हे रिझल्ट अत्यंत उत्साहवर्धक आहेत. कारण सर्वसामान्यपणे लशीचा परिणाम युवकांच्या तुलनेत वृद्धांवर फार कमी होत असतो. मात्र आलेल्या या रिझल्टमध्ये, 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांतही अँटीबॉडीजचे प्रमाण तरुणांच्या तुलनेत असल्याचे आढळून आले आहे.

coronavirus vaccine moderna inc producing immune response in older people in early trials | खूशखबर! आता वृद्धांमध्येही तयार होणार कोरोनाविरोधात इम्युनिटी, 'या' कंपनीच्या लशीला मोठं यश

खूशखबर! आता वृद्धांमध्येही तयार होणार कोरोनाविरोधात इम्युनिटी, 'या' कंपनीच्या लशीला मोठं यश

Next
ठळक मुद्देकुठल्याही प्रकारचे गंभीर साइड-इफेक्ट्स नाही 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांतही अँटीबॉडीजचे प्रमाण तरुणांच्या तुलनेतहे परीक्षण 20 लोकांवर करण्यात आले होते.

वॉशिंग्टन - कोरोना व्हायरसविरोधातील लस तयार करणारी कंपनी Moderna Incला वृद्धांवर केलेल्या परीक्षणाचे उत्साहवर्धक रिझल्ट मिळाले आहेत. कंपनीने लशीच्या सुरुवातीच्या परीक्षणाचा नवा सेफ्टी डेटा जारी केला आहे. यात वृद्धांना कोरोना लस दिल्यानंतर इम्यून सिस्टममध्ये रिस्पॉन्स तयार झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. पहिल्या टप्प्यावरील परीक्षणात Moderna च्या लशीने मोठ्या प्रमाणावर न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी तयार केली.

सर्वसामान्यपणे वृद्धांवर कमी परिणाम होतो - 
कंपनीने एक निवेदन जारी करत यासंदर्भात माहिती दिली आहे. हे रिझल्ट अत्यंत उत्साहवर्धक आहेत. कारण सर्वसामान्यपणे लशीचा परिणाम युवकांच्या तुलनेत वृद्धांवर फार कमी होत असतो. मात्र आलेल्या या रिझल्टमध्ये, 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांतही अँटीबॉडीजचे प्रमाण तरुणांच्या तुलनेत असल्याचे आढळून आले आहे. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या अॅडव्हायझरी कमिटी ऑन इम्युनायजेशन प्रॅक्टिसेसच्या समक्ष हा डेटा ठेवण्यात आला. हे परीक्षण 20 लोकांवर करण्यात आले होते.

कुठल्याही प्रकारचे गंभीर साइड-इफेक्ट्स नाही -
या लशीचे परीक्षण अखेरच्या टप्प्यात पोहोचले आहे. विशेष म्हणजे, जेवढा डोस अखेरच्या टप्प्यावर आहे, तेवढाच डोस या परिक्षणादरम्यानही देण्यात आला. यात, कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांपेक्षाही अधिक अँटीबॉडीचे प्रमाण आढळून आले आहे. ही लस दिल्यानंतर, थंडी, ताप आणि थकव्यासारखे साइड-इफेक्ट्स दिसून आले. मात्र, विशेष गंभी परीणाम दिसून आला नाही.

तरुणांवरही सकारात्मक परिणाम -
यापूर्वी कंपनीने याच परिक्षणाच्या डेटावरून सिद्ध केले होते, की ही लस तरुणांमध्ये कोरोना व्हायरसविरोधत अँटीबॉडी तयार करत आहे. मात्र, वृद्धांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे, त्यांच्यासाठीही परिणामकारक ठरू शकेल, अशी लस तयार करण्यावर कंपनीने लक्ष केंद्रित केले होते. 

महत्त्वाच्या बातम्या -

आता अमेरिकेतील शाळा-महाविद्यालयांत पसरला कोरोना, हजारो विद्यार्थ्यांसह शिक्षकही क्वारंटाइन

खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण

'या' राज्यात आतापर्यंत तब्बल 23 आमदारांना कोरोनाची लागण, खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती  

CoronaVirus : कोरोनापासून बचावासाठी जगभरात लागू आहे 'हा' नियम, वैज्ञानिकांनीच उपस्थित केले गंभीर प्रश्न

CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्‍ट नसल्याचा दावा

CoronaVaccine : 73 दिवसांत नाही! सीरमनं स्वतःच सांगितलं COVISHIELD लस केव्हा येणार बाजारात

Web Title: coronavirus vaccine moderna inc producing immune response in older people in early trials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.