शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

CoronaVirus News: अमेरिकेचा चीनला मोठा दणका; बलाढ्य चिनी कंपन्यांना धोका वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 8:18 PM

अमेरिकेनं मोठा निर्णय घेतला; बलाढ्य कंपन्यांची शेअर बाजारातून हकालपट्टी होणार?

वॉशिंग्टन: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावरून चीनवर वारंवार आरोप करणाऱ्या अमेरिकेनं आता कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. चिनी अर्थव्यवस्थेला धक्का देण्यासाठी अमेरिकेच्या संसदेनं मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकन संसदेनं डिलिस्टिंग विधेयकाला मंजुरी दिली आहे. यामुळे अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेड आणि बैदू इंक सारख्या चिनी कंपन्यांना अमेरिकेन शेअर बाजारांमध्ये निर्बंधांचा सामना करावा लागू शकतो. कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या जवळपास १६ लाखांच्या घरात असून मृतांचा आकडा ९५ हजारांपेक्षा अधिक आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या संसदेत डिलिस्टिंग विधेयक मंजूर करण्यात आलं. विशेष म्हणजे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही प्रमुख पक्षांनी विधेयकाला पाठिंबा दिला. लुसियानाचे रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर जॉन केनेडी आणि मॅरीलँडचे डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार क्रिस वॅन हॉलेन या दोघांनी विधेयक संसदेसमोर मांडलं होतं. ते सर्वसंमतीनं मंजूर करण्यात आलं. नव्या विधेयकानुसार कंपन्यांना आपण परदेशी सरकारच्या नियंत्रणाखाली नसल्याचं सिद्ध करावं लागेल. अमेरिकन संसदेत डिलिस्टिंग विधेयक मंजूर होताच अमेरिकन शेअर बाजारात नोंद असलेल्या काही चिनी कंपन्यांचे समभाग गडगडले. विशेष म्हणजे त्यावेळी बाजारात तेजी होती. अमेरिकेतून चिनी कंपन्यांमध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक होते. त्याबद्दल अमेरिकेच्या खासदारांनी चिंता व्यक्त केली. अमेरिकेची बरीचशी गुंतवणूक पेन्शन आणि कॉलेज एंडोमेंट फंडात आहे. ती सुरक्षित करण्यासाठी अमेरिकेनं डिलिस्टिंग विधेयक मंजूर केलं आहे.डिलिस्टिंग विधेयकात कोणत्या तरतुदी?आपण कोणत्याही परदेशी सरकारच्या नियंत्रणाखाली नाही हे दाखवण्यात कंपनी अपयशी ठरल्यास अमेरिकन शेअर बाजारात तिच्यावर निर्बंध घालण्यात येतील. अमेरिकेचं पब्लिक अकाऊंटिंग ओवरसाईट बोर्ड सलग तीन वर्षे संबंधित कंपनीचं ऑडिट तपासू न करू शकल्यास आणि त्यामुळे कंपनी परदेशी सरकारच्या नियंत्रणाखाली नसल्याचं सिद्ध होऊ न शकल्यास कंपनीवर निर्बंध लादले जातील. त्यामुळे संबंधित कंपनीला अमेरिकन शेअर बाजारात निर्बंधांचा सामना करावा लागेल.पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद; सीआरपीएफकडून सर्च ऑपरेशन सुरूसीमेवर घुसखोरी! चीनविरोधात आता भारताला अमेरिकेची साथपीएम केअर फंडाविरोधात ट्विट करणं काँग्रेसला भोवलं; थेट सोनिया गांधींवर गुन्हा दाखलतिकिटांचे दर निश्चित; देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी सरकार सज्ज

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाchinaचीन