शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

coronavirus: कोरोनाचा फटका : अमेरिकेत एच-१ बी व्हिसा देणे बंद करण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 02:11 IST

ट्रम्प सरकार परदेशी नागरिकांना दिला जाणारा एच-१ बी व्हिसा, तसेच विद्यार्थी व्हिसा ज्यात काही कालखंडासाठी काम करण्याची अनुमती दिली जाते, हे देणे काही काळासाठी तात्पुरते बंद करण्याच्या विचारात आहे.

वॉशिंग्टन - कोरोना संसर्गाच्या काळात अमेरिकेत बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथील लोकांना नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ट्रम्प सरकार परदेशी नागरिकांना दिला जाणारा एच-१ बी व्हिसा, तसेच विद्यार्थी व्हिसा ज्यात काही कालखंडासाठी काम करण्याची अनुमती दिली जाते, हे देणे काही काळासाठी तात्पुरते बंद करण्याच्या विचारात आहे. एच-१ बी व्हिसा आयटी क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या भारतीयांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या धोरणाचा थेट फटका अमेरिकेत नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीयांना बसू शकतो.एच-१ बी व्हिसाच्या आधारे भारत आणि चीनमधून येणाºया विदेशी नागरिकांना अमेरिकेतील बड्या कंपन्या कामावर रुजू करून घेत असतात. अशा प्रकारच्या व्हिसावर तब्बल ५ लाख विदेशी नागरिक अमेरिकेत नोकºया करीत आहेत. यातील अनेकांना तिथे कायमस्वरूपी राहता येते.अमेरिकेच्या अध्यक्षांचे इमिग्रेशन सल्लागार अशा प्रकारचे एच-१ बी व्हिसा, तसेच ठराविक काळासाठी देण्यात येणारे एच-२ बी व्हिसा सध्या काही काळासाठी दिले जाऊ नयेत, या दिशेने धोरण आखत आहेत. या महिन्यात या धोरणाला अंतिम रूप दिले जाण्याची शक्यता आहे.कोरोनाच्या प्रकोपामुळे मागील २ महिन्यांत ३.३ कोटी अमेरिकन लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. या काळात येथील अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले आहे.ही गंभीर स्थिती लक्षात घेता ट्रम्प सरकारने परदेशी व्यक्तींना दिल्या जाणाºया नागरिकत्वाबाबत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशाच्या सीमा आधीच इतरांसाठी बंद केल्या आहेत. नवीन स्थलांतरितांना येण्यासाठी ६० दिवसांसाठी तात्पुरत्या बंदीचे आदेश ट्रम्प यांनी मागच्याच महिन्यात दिले होते. (वृत्तसंस्था)अर्थव्यवस्था गंभीर संकटात14.7% अमेरिकेत एप्रिलमधील बेकारीचा दर. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेने येणारा काळ अमेरिकेच्या अर्थव्यस्थेसाठी संकटाचा असेल, असे भाकीत वर्तविले आहे. दुसºया तीन महिन्यांत अमेरिकन अर्थव्यवस्था उणे १५ ते २० टक्क्यांनी वाढेल, असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :United Statesअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्था