coronavirus : वुहानमधील त्या लॅबमधून अशा प्रकारे पसरला कोरोना, अमेरिकी माध्यमांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 05:58 PM2020-04-18T17:58:08+5:302020-04-18T18:00:30+5:30

कोरोनाच्या संक्रमणामुळे अमेरिकेत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोनावरून अमेरिका आणि चीन आमनेसामने आले आहेत

coronavirus: US media claim Corona virus spread from that lab in Wuhan BKP | coronavirus : वुहानमधील त्या लॅबमधून अशा प्रकारे पसरला कोरोना, अमेरिकी माध्यमांचा दावा

coronavirus : वुहानमधील त्या लॅबमधून अशा प्रकारे पसरला कोरोना, अमेरिकी माध्यमांचा दावा

Next
ठळक मुद्देवुहानमधील इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी लॅबमध्ये काम करणाऱ्या एखाद्या इंटर्नकडून कोरोना विषाणू अपघाताने लीक झाला असावाफॉक्स न्यूज या अमेरिकन वृत्तवहिनीचा दावाचीनमधील वुहान येथे असलेल्या लॅबमध्ये कोरोनासारख्या अनेक विषाणूंचा अभ्यास केला जातो

न्यूयॉर्क - चीनमधून पसरण्यास सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे अमेरिकेत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोनावरून अमेरिका आणि चीन आमनेसामने आले आहेत. दरम्यान, अमेरिकी प्रसार माध्यमांनी वुहानमधील लॅबमधून झालेल्या कोरोना विषाणूच्या फैलावाबाबत धक्कादायक दावा केला आहे.

वुहानमधील इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी लॅबमध्ये काम करणाऱ्या एखाद्या इंटर्नकडून कोरोना विषाणू अपघाताने लीक झाला असावा, असा दावा फॉक्स न्यूज या अमेरिकन वृत्तवहिनीने केला आहे. 

कोरोना विषाणू हा जैविक अस्त्र नाही. चीनमधील वुहान येथे असलेल्या लॅबमध्ये कोरोनासारख्या अनेक विषाणूंचा अभ्यास केला जातो. तिथूनच हा विषाणू पसरला. कोरोनाचा पहिला रुग्ण हा या लॅबमधीलच असल्याचा दावाही फॉक्स न्यूजने केला आहे.

Web Title: coronavirus: US media claim Corona virus spread from that lab in Wuhan BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.