शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Coronavirus : कोरोनाची साथ पसरविल्याबद्दल चीनविरोधात अमेरिकेत खटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 01:22 IST

Coronavirus : कोरोना साथीचा चीनशी संबंध जोडणाऱ्या वदंता समाजमाध्यमांत पसरविल्या जात आहेत. ही साथ मानवनिर्मित असण्याची शक्यता जगातील आघाडीच्या वैज्ञानिकांनी ठामपणे फेटाळून लावलेली असताना हे प्रकरण न्यायालयात दाखल केले जावे, हे विशेष.

वॉशिंग्टन : सध्या जगातील ११०हून अधिक देशांत हाहाकार माजविलेल्या कोरोना, म्हणजेच ‘कोविड-१९’ या विषाणूची साथ चीनने जाणते-अजाणतेपणी पसरविली आहे, असा आरोप करणारा व त्यासाठी चीनकडून २० अब्ज डॉलरच्या भरपाईची मागणी करणारा खटला अमेरिकेत दाखल करण्यात आला आहे.कोरोना साथीचा चीनशी संबंध जोडणाऱ्या वदंता समाजमाध्यमांत पसरविल्या जात आहेत. ही साथ मानवनिर्मित असण्याची शक्यता जगातील आघाडीच्या वैज्ञानिकांनी ठामपणे फेटाळून लावलेली असताना हे प्रकरण न्यायालयात दाखल केले जावे, हे विशेष. अशा प्रकारच्या वादग्रस्त विषयांवर न्यायालयांत दावे दाखल करण्याचा पूर्वेतिहास असलेले लॅरी केमॅन, ‘फ्रीडम वॉच’ ही त्यांची संघटना व बझ फोटोज या नावाच्या कंपनीने ‘क्लास अ‍ॅक्शन’ स्वरूपाचा हा दावा टेक्सास राज्यातील संघीय जिल्हा न्यायालयात दाखल केला आहे.ठराविक व्यक्तीसाठी नव्हे, तर बाधित मोठ्या समाजवर्गासाठी भारतात जशी जनहित याचिका करता येते. तशाच स्वरूपाचा अमेरिकेतील हा ‘क्लास अ‍ॅक्शन सूट’ असतो. यात चीन सरकार, त्या देशाचे लष्कर व जेथून या विषाणू संसर्गाचा उगम झाला त्या ‘वुहान इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी’ यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.नोव्हेल कोरोना विषाणूची उत्पत्ती ‘वुहान इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी’मध्ये सुरूअसलेल्या संशोधनातून झाली. हे संशोधन चीनच्या लष्करातर्फे केले जात आहे. तेथून या विषाणूचा मुद्दाम वा अपघाताने बाहेर प्रसार होण्यास चीन सरकार व त्यांच्या संस्था जबाबदार आहेत, असे या दाव्यातील मुख्य प्रतिपादन आहे. हे चीनकडून वापरले गेलेले हे जैविक अस्त्र आहे आणि अशा अस्त्रांवर १९२४च्या जागतिक करारान्वये पूर्ण बंदी असल्याने चीनकडून या कराराचा भंग झाला आहे. त्यासाठी त्यांना जबाबदार धरून भरपाई द्यायला लावावी, असे वादींचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)पुरावे देता येतील?हा दावा कायदे आणि आंतरराष्ट्रीय करार-मदारांच्या निकषांवर कितपत टिकेल आणि चीनवर खापर फोडण्यासाठी दावा करणारे कितपत ग्राह्य पुरावे सादर करू शकतील याविषयी साशंकता असली तरी असे दावे तुलनेने झटपट निकाली निघतात आणि मंजूर झाले तर अब्जावधी डॉलरच्या भरपाईचे आदेशही होतात, असा इतिहास आहे. अनेक औषध कंपन्या. कीटकनाशक कंपन्या व सिगारेट कंपन्यांविरुद्ध यापूर्वी असे आदेश दिले गेलेले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाchinaचीन