शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

coronavirus : अमेरिकेत एक दिवसात हजारांवर कॊरोनाबळी, रुग्णांची संख्या दोन लाखांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 8:42 AM

वेगाने वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे महाशक्ती असलेल्या अमेरिकेतील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे.

ठळक मुद्देवेगाने वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे महाशक्ती असलेल्या अमेरिकेतील आरोग्य यंत्रणा कोलमडलीकाल एका दिवसात अमेरिकेत कोरोनाची बाधा झालेले सुमारे 26 हजार 473 नवे रुग्ण आढळले अमेरिकेत कालच्या एका दिवसात 1 हजार 49 जणांचा मृत्यू

न्यूयॉर्क - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे अमेरिकेमध्ये भीषण परिस्थिती ओढवली आहे. वेगाने वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे महाशक्ती असलेल्या अमेरिकेतील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. काल एका दिवसात अमेरिकेत कोरोनाची बाधा झालेले सुमारे 26 हजार 473 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील एकूण रुग्णांची संख्या दोन लाखांच्यावर पोहोचली आहे. तर कालच्या एका दिवसात 1 हजार 49 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत एकूण 5 हजार 102 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या फैलावाचा वेग जगभरात कायम असून, जगभरातील कोरोनाबधितांचा आकडा 9 लाख 35 हजारांच्या वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे मृतांची संख्या 47 हजार 192 झाली आहे. दरम्यान, कोरोनामुळे काल एका दिवसात जगभरात 4 हजार 883 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात अमेरिकेत एका दिवसात 1049 जणांचा मृत्यू झाला आहे. तर युरोपमधील इटली आणि स्पेनमध्येही कोरोनाचे थैमान सुरू आहे. इटलीमध्ये मृतांचा आकडा 13 हजार 153 जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये काल एका दिवसात 923 जणांचा मृत्यू झाला. तसेच 9 हजारांच्या आसपास नवे रुग्ण आढळल्याने स्पेनमधील कोरोनाबधितांचा आकडा 1 लाख 4 हजार 118 पर्यंत पोहोचला आहे. 

अमेरिकेचे 9/11च्या हल्ल्यापेक्षाही मोठे नुकसान 

कोरोना व्हायरसपुढे महासत्ता म्हणवली जाणारी अमेरिकाही पुरती हतबल झाली आहे. अमेरिकेत बुधवारी कोरोना व्हायरसमुळे मरणाऱ्यांचा आकडा 5,102 वर जाऊन पोहोचला. या आकड्याने अमेरिकेवर 9/11ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या आकड्यालाही मागे टाकले आहे. 2001मध्ये झालेल्या या हल्लात जवळपास ३ हजार अमेरिन नागरिकांचा मृत्यू झाला होता. येथील 190,000 हून अधिक लोक कोरोना संक्रमित आहेत. 

 हा जीवन मरणाचा प्रश्न आहे - ट्रम्प

अमेरिकन नागरिकांसाठी 30 दिवसांपर्यंत नियमांचे पालन करणे नक्कीच कठीन गोष्ट आहे. मात्र हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांन दोन दिवसांपूर्वीच सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचा कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढवला होता. एवढेच नाही, तर कोरोनाची तुलना फ्लूशी करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले होते. कठोर नियम केलेले असतानाही मरणारांची संख्या एक ते दो लाखांपर्यंत पोहोचू शकतो, अशी शक्यता व्हाईट हाऊस टास्क फोर्सच्या सदस्य डेबोरा ब‌र्क्स यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnited StatesअमेरिकाDeathमृत्यूInternationalआंतरराष्ट्रीय