शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : अमेरिकेत कोरोनाचे थैमान! कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखांवर, 49,845 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 12:30 IST

Coronavirus : अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यां आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे.

कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे.  जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 190,654 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 27 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 745,620 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. 

अमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने थैमान घातले आहे या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा आठ लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 3,176 लोकांचा मृत्यू झाला. जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या 24 तासांत तब्बल 3,176 लोकांचा मृत्यू झाला असून हा मोठा आकडा आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या ही जवळपास 50 हजार झाली आहे.

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची आकडेवारी जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या 880,204 झाली असून आतापर्यंत 49,845 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनासाठी संशयितांची चाचणी करण्याचे भारताचे धोरण (स्ट्रॅटेजी) योग्य ठरल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. 23 मार्चला 14,594 जणांचे नमुने तपासले असता रुग्णसंख्या 400 वर पोहोचली, तर 22 एप्रिलपर्यंत 5 लाख नमुने तपासल्यानंतर 22 हजार रुग्ण आढळले. इतर देशांच्या तुलनेत भारतात 5 लाख चाचण्यांमागे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे प्रमाण 4.5 टक्के आहे. अमेरिकेत 26 मार्चला 5 लाख चाचण्यांनंतर 80 हजार रुग्ण सापडले होते. यावरून जगाच्या तुलनेत भारताचे धोरण आतापर्यंत प्रभावी ठरल्याचा दावा पर्यावरण सचिव व एमपॉवर्ड ग्रुप-२ चे अध्यक्ष सी. के. मिश्रा यांनी केला आहे.

लॉकडाउनच्या तीस दिवसांमध्ये आपण रुग्णांपर्यंत पोहोचलो. कोरोना प्रसाराची साखळी रोखू शकलो. जगभरापेक्षा भारतात कोरोना प्रसाराचा वेग बऱ्यापैकी नियंत्रणात असल्याचेही ते म्हणाले. गेल्या तीस दिवसांचा आढावा त्यांनी पत्रकारांसमोर मांडला. मिश्रा म्हणाले, तीस दिवसांच्या लॉकडाउनमध्ये भारताने चाचणी क्षमता 33 पटींनी वाढवली आहे. अमरनाथ यात्रा यंदा रद्द करण्याचा निर्णय सरकारने गुरुवारी मागे घेतला. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे ही यात्रा जून महिन्यात होईल. कोरोना संसर्गाच्या कारणास्तव अमरनाथ यात्रा यावर्षी रद्द करण्याचे सरकारने बुधवारी ठरविले होते. या यात्रेला देशातून दरवर्षी लाखो भाविक जातात.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus: अन्य देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली; प्रसाराचा वेग स्थिर

CoronaVirus: मेच्या मध्यात देशातील मृतांचा आकडा ३८ हजारांवर जाणार?

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाDeathमृत्यूItalyइटली