शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

CoronaVirus: कोरोनाचा जन्म चीनमधला; पण 'या' देशांना सर्वाधिक फटका; आकडेवारी पाहून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 16:55 IST

coronavirus चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाचा अमेरिकेसह युरोपीय देशांना मोठा फटका

मुंबई: चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनानं आतापर्यंत हजारो जणांचा जीव घेतला आहे. तर आठ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. चीनच्या वुहानमध्ये सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली. चीनच्या अनेक प्रांतांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळू लागले. मात्र चीननं सध्या तरी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याचं दिसतं आहे. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका युरोप आणि अमेरिकेला बसला आहे. विशेष म्हणजे या देशांना बसत असलेला फटका चीनपेक्षा अधिक आहे.वर्ल्डोमीटर हे संकेतस्थळ कोरोनाबाधितांचा आकडा, मृतांची संख्या याबद्दलची माहिती देतं. या संकेतस्थळानं आजपर्यंत (१ एप्रिल) दिलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात ८ लाख ७२ हजार ९७२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४३ हजार २७५ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. कोरोनामधून बरे झालेल्यांची संख्या १ लाख ८४ हजार ५९४ इतकी आहे. चीनमध्ये सर्वप्रथम कोरोना विषाणू आढळून आला. कोरोनानं चीनमध्ये ३ हजार ३१२ जणांचा बळी घेतला. चीनमध्ये ८१ हजार ५५४ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातले ७६ हजार २३८ जण यातून बरेदेखील झाले. चीनमधून कोरोना युरोपात पोहोचला. इटलीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. सध्याच्या घडीला इटलीतील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख ५ हजार ७९२ इतकी असून १२ हजार ४२८ जणांनी जीव गमावला आहे. तर केवळ १५ हजार ७२९ जण रुग्णालयातून घरी परतले आहेत.युरोप खंडातल्याच स्पेनमध्येही कोरोनानं थैमान घातलं. स्पेनमध्ये कोरोनाचे १ लाख २ हजार १३६ रुग्ण असून मृतांचा आकडा ९ हजार ५३ वर पोहोचला आहे. स्पेनमधले २२ हजार ६४७ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. युरोपनंतर अमेरिकेला कोरोनाचा फटका बसला. अमेरिकेत सध्या कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. १ लाख ८८ हजार ६३९ अमेरिकन व्यक्ती सध्या कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा ४ हजाराच्या पलीकडे पोहोचला आहे. तर बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ७ हजार २५१ इतकी आहे. अमेरिका, इटली, स्पेनसोबतच जर्मनी, फ्रान्स, इराणमध्येही कोरोनाचा कहर पाहायला मिळतो आहे. जर्मनीत ७२ हजार ३८३ जणांना कोरोनाची लागण झाली असून ७८८ जणांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये ५२ हजार १२८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ३ हजार ५२३ इतका आहे. इराणमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ४७ हजार ५९३ इतकी असून ३ हजारहून अधिक जणांनी जीव गमावला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनAmericaअमेरिकाItalyइटली