शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

Coronavirus : चीनमध्ये आतापर्यंत ६६,००० लोकांना डिस्चार्ज, ब्रिटन, आयर्लंडमधील प्रवाशांना अमेरिकेत येण्यास बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 05:11 IST

चीनमध्ये कोरोनाचे २० नवे रुग्ण समोर आले आहेत. देशात आणखी १० लोकांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या आता ३,१९९ झाली आहे. सर्व १० लोकांचा मृत्यू वुहानमध्ये झाला आहे. देशातील रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.

बीजिंग : चीनमध्ये शनिवारपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ८०,७७८ वर पोहोचली होती. त्यातील १०,७३४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, तर ६६,९११ जणांची प्रकृती ठीक झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. विदेशातून चीनची राजधानी बीजिंगमध्ये आलेल्या सर्व प्रवाशांना सोमवारपासून सुरू होणाऱ्या क्वारंटाईनमध्ये कोरोनासंदर्भातील वैद्यकीय चाचणीसाठी पाठविले जाणार आहे. अन्य देशांतून आॅस्ट्रेलियामध्ये येणा-या प्रवाशांची १४ दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये रवानगी केली जाणार आहे. दरम्यान, जगातील मृतांची संख्या आता ६००० वर पोहोचली आहे.चीनमध्ये कोरोनाचे २० नवे रुग्ण समोर आले आहेत. देशात आणखी १० लोकांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या आता ३,१९९ झाली आहे. सर्व १० लोकांचा मृत्यू वुहानमध्ये झाला आहे. देशातील रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, विदेशींमुळे संक्रमणाच्या घटना बीजिंग आणि शांघाईमध्ये समोर आल्या आहेत. हुबेईच्या बाहेरील क्षेत्रात सलग तिसºया दिवशी नवा रुग्ण आढळून आलेला नाही.

कोरोनाच्या धास्तीमुळे इटलीपाठोपाठ स्पेननेही देशभरातील नागरिकांना सर्व कामकाज शनिवारी बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. कार्यालयात जाण्यासाठी, वैद्यकीय कारण किंवा अन्नधान्य खरेदीसाठीच घराबाहेर पडण्याची मुभा नागरिकांना देण्यात आली होती. त्या देशात कोरोनामुळे १५ दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.स्पेनमध्ये ५,७५३ जणांना या विषाणूची लागण झाली असून, आतापर्यंत तिथे १८३ जणांचा बळी गेला आहे.ब्रिटनमध्ये कोरोनाच्या साथीमुळे राणी एलिझाबेथ दुसरी या बंकिंगहम राजवाड्यातून विंडसर कॅसलमध्ये राहायला गेल्या आहेत.डोनाल्ड ट्रम्प यांचा अहवाल निगेटिव्ह-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे त्यांच्या वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले आहे. आता ब्रिटन, आयर्लंड या देशांतील प्रवाशांनाही अमेरिकेत येण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे चीनमध्ये रविवारी आणखी दहा जण मरण पावले असून, त्यामुळे तेथील बळींची संख्या आता ३,१९९ वर पोहोचली आहे.- ब्राझीलच्या एका शिष्टमंडळाबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेत काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. या शिष्टमंडळातील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्याने ट्रम्प यांनीही वैद्यकीय चाचणी करून घेण्याचे ठरविले होते.अमेरिकेमध्ये २,७०० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, ५७ जण मरण पावले आहेत. ब्रिटन, आयर्लंड येथील प्रवाशांनाही अमेरिकेत येण्यास ट्रम्प सरकारने तात्पुरती बंदी घातली असून, ती सोमवार मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.भारतीय कर्मचा-याला लागणसुटी संपवून संयुक्त अरब अमिरातीमध्ये परतलेल्या एका भारतीय कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये आतापर्यंत ८५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. इराणमध्ये कोरोना साथीचा आणखी फैलाव झाल्यास त्या देशातील वैद्यकीय सुविधांवर मोठा ताण पडणार आहे.इस्लाममध्ये तिसºया क्रमांकाची महत्त्वाची धार्मिक वास्तू असलेली इराणमधील अल् अक्सा मशीद बेमुदत काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ३४ वर पोहोचली आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाIndiaभारतHealthआरोग्य