शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: रोबोट घेणार कोरोना रुग्णांची काळजी; डॉक्टरांवरील भार कमी करण्यासाठी 'पेपर' सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 00:05 IST

‘पेपर’ असं या रोबोटचं नाव. तो या हॉटेलमधल्या रुग्णांच्या दिमतीला पांढरा सर्जिकल मास्क लावून हजर आहे.

जपान - कोरोना व्हायरसने शिस्तप्रिय जपानी समाजालाही घेरलंच. आजच्या घडीला जपानमध्ये १५,५५६ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, ५८५ लोक मृत्युमुखी पडले आहेत. जपानच्या लोकसंख्येत तरुणांपेक्षा ज्येष्ठांचे प्रमाण जास्त असल्याने तिथं खबरदारीही अधिक घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जपानमधील टोकियो शहरामध्ये एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूची लक्षणं दिसत नाहीत, पण त्यांना संसर्ग झालेला आहे असे रुग्ण आणि ज्यांच्यामध्ये मध्यम लक्षणं आहेत, अशा रुग्णांना दवाखान्यात न ठेवता वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तिथल्या दवाखान्यांवरचा वाढता ताण कमी करणं आणि ज्यांना गरज आहे, त्यांच्यासाठी बेड उपलब्ध करणं असा यामागचा हेतू आहे. त्यासाठी टोकियो शहरातील पाच हॉटेल्स मिळून दहा हजार हॉटेल रुम्स तिथल्या सरकारने ताब्यात घेतल्या असून, त्या हॉटेल्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी दोन नर्स आणि एका डॉक्टरचीही नेमणूकही करण्यात येणार आहे. मात्र, या रुग्णांची त्या हॉटेल्समध्ये काळजी घ्यायला ‘रोबोट’ची नियुक्ती करण्यात आली आहे, हे विशेष.

‘पेपर’ असं या रोबोटचं नाव. तो या हॉटेलमधल्या रुग्णांच्या दिमतीला पांढरा सर्जिकल मास्क लावून हजर आहे. सॉफ्टबॅँक रोबोटिक्स नावाच्या कंपनीने बनविलेला हा रोबोट अनेक प्रकारची कामं करणार आहे. म्हणजे तो टॉकिंग रोबोट आहे. तो स्वागत कक्षात रुग्णांचं स्वागत करेल. त्यांना सांगेल, की मास्क निट लावा. ताप किती तपासला का, तो नोंदवून घ्या. मग गप्पाही मारेल, काळजी करू नका, लवकर बरे व्हाल. क्लिनिंग रोबोट म्हणूनही काम करेल, या रुग्णांच्या खोल्यांसह ते ज्या भागात राहतील त्या भागात सफाईचं काम रोबोट करेल. डायनिंग परिसरात सर्व्ह करायला, मदत करायला हजर राहील. आर्टिफिशिअल इंटिलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून हा रोबोट प्रत्येक रुग्णाची काळजी घेईल, त्याच्याकडे रुग्णाची सारी माहितीही असेल. रेड झोनमध्ये अधिकाधिक असे रोबोट वापरण्याचा जपान सरकारचा मानस आहे.त्यामुळे तेथील वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळावरचा ताण आणि त्यांना असलेला संसर्गाचा धोका कमी होईल. टोकियोतील एका हॉटेलमध्ये या पेपर रोबोटने टोकियोचे गर्व्हनर युरीको कोईके यांचं स्वागत केलं आणि कामाला सुरुवातदेखील केली आहे. यंत्रं माणसांचं जगणं सोपं करतात, याचं हे एक आणखी पुढचं पाऊल आहे या महामारीच्या संकटकाळातलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJapanजपान