शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

coronavirus: अमेरिकेत निवडणुकीआधी लसीच्या मान्यतेसाठी वाढतोय दबाव, संशोधकांना लागली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 6:24 AM

अमेरिकेत फायझर व मॉडेर्ना या कंपन्यांनी लसीच्या मानवी चाचण्यांच्या तिसºया टप्प्याला २७ जुलै रोजी सुरुवात केली. या चाचण्यांसाठी ३० हजार स्वयंसेवकांची गरज लागणार असून, सध्या १५ हजार स्वयंसेवक उपलब्ध झाले आहेत.

वॉशिंग्टन : किमान एका कोरोना प्रतिबंधक लसीला अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या आधी मान्यता द्यावी, असा दबाव राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संबंधित यंत्रणांवर आणण्याची शक्यता आहे. तशी चर्चा सुरू आहे.कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित असल्याचे प्रयोगांतून सिद्ध होण्याच्या आधीच राजकीय दबावापोटी तिला मान्यता देणे ही अत्यंत आक्षेपार्ह कृती असेल, असे तेथील संशोधकांचे मत आहे.अमेरिकेत फायझर व मॉडेर्ना या कंपन्यांनी लसीच्या मानवी चाचण्यांच्या तिसºया टप्प्याला २७ जुलै रोजी सुरुवात केली. या चाचण्यांसाठी ३० हजार स्वयंसेवकांची गरज लागणार असून, सध्या १५ हजार स्वयंसेवक उपलब्ध झालेआहेत.तिसºया टप्प्यात स्वयंसेवकांना फायझर कंपनी २१ दिवसांत तर मॉडेर्ना २८ दिवसांत लसीचे दोन डोस देणार आहे. या दोन्ही कंपन्या लस विकसित करण्यासाठी एकाच प्रकारचे तंत्रज्ञान वापरत आहेत. या लसी टोचलेल्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचे दिसून आले. तरीही एवढ्या एकाच गोष्टीवरून त्या लसी कोरोनावर रामबाण उपाय आहेत, हे सिद्ध होत नाही.निष्काळजीपणामुळे हानी झाल्याचा आरोपराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या पहिल्या कारकीर्दीच्या अखेरच्या वर्षात कोरोनामुळे हानी झाली.ट्रम्प सरकारच्या निष्काळजीपणामुळे ही स्थिती ओढवली, असा आरोप डेमोक्रॅटिक पक्षाने केला आहे.त्यामुळे निवडणुकीआधी कोरोनाच्या लसीला मान्यता मिळाल्यास त्याचा राजकीय लाभ उठविता येईल, अशी रणनीती डोनाल्ड ट्रम्प यांनी आखलेली असू शकते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnited Statesअमेरिका