शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनानं मरायचं की भूकबळीनं?; बोलावियामध्ये जगण्यासाठी दुहेरी संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 06:14 IST

बोलाविया सरकार हतबल आहे. एक सैन्य सोडलं, तर दुसरी काही व्यवस्थाच त्यांच्याकडे नाही, जी कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करू शकेल.

दक्षिण अमेरिकेतील बोलाविया, अर्जेंटिना देश आधीच गरिबी आणि अस्मानी सुलतानी संकटांनी होरपळलेले आहेत. त्यात आणि तिथं कोरोना पोहोचला. बोलावियामध्ये सध्या कोरोना विषाणूचे ६७२ पॉझिटिव्ह आणि ४० मृत्यू, अशी आकडेवारी आहे; मात्र, या कोरड्या आकडेवारीपलिकडे आहे या देशातल्या भीषण लॉकडाऊनची गोष्ट.बोलाविया देशात मोठे उद्योग नाहीत. सगळा व्यवसाय- व्यापार रस्त्यावर चालतो. साधारणत: १५ लाख नागरिक या देशात फिरतेविक्रेते, स्ट्रिट वेंडर्स आहेत. त्यांचं पोट त्याच्यावरच चालतं. या देशाच्या सरकारने कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केलं आणि या व्यापारी, व्यावसायिकांचं काम ठप्प झालं. सरकारने वायदाही केला की, आम्ही सगळ्यांना अन्नधान्य देऊ; मात्र, सरकार सर्वदूर पोहोचू शकत नाही, यंत्रणेच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत.एकीकडे बोलावियातलं स्ट्रिट फूड अत्यंत नावाजलं जातं. ते खायला लोक विदेशातून येतात. ते खाणं हा काहींना साहसी खेळही वाटतो आणि मग बोलावियात स्ट्रिट फूड खाताना अमूक काळजी घ्या, तमूक करा, असे लेखही व्हायरल केले जातात.आता ते सारंच ठप्प झालं आहे आणि तेथील माणसांचे हातच नाहीत तर पोटही रिकामी राहू लागली आहेत. आता तिथंही तोच गंभीर प्रश्न आहे की, कोरोना संसर्गानं मरायचं की भूकबळीनं. आता बोलावियातले नागरिकही बोलू लागलेत की, अशा संकटकाळात आमचा बहुतेक भूकबळी जाणार...न्याताहा नावाची महिला एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला सांगते की, मला सहा मुलं असून, मी एकल माता आहे. माझ्या हाताला काही काम नाही, तर या मुलांचं पोट मी कसं भरू शकते? यावर तिथलं सरकार म्हणतं, ‘अन्न देऊ.’ पण ते कधी देणार, आम्ही मेल्यावर?’बोलाविया सरकारही दुसऱ्या बाजूला हतबल आहे. एक सैन्य सोडलं, तर दुसरी काही व्यवस्थाच त्यांच्याकडे नाही, जी कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करू शकेल.सैन्याच्या धाकाने आधी लोक घरात बसवले आणि आता तेच सैन्य अन्नधान्य पोहोचवणं तसेच औषधं, पेट्रोल आणि जीवनावश्यक गरजा पोहोचवत आहे. आरोग्य यंत्रणा उभी राहते आहे, ती सज्ज होते आहे, तोवर सैनिकी दवाखाने वापरण्यात आले.सैन्याच्या मदतीनं सरकार संकटाशी दोन हात करत आहे; मात्र, या साऱ्याला मानवी चेहरा नाही. भुकेल्या माणसांचं काय होईल, याचं उत्तर आजच्या घडीला नाही. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी तिथलं सरकार राबतं आहे, हेदेखील खरं आहे आणि माणसं उपाशी आहेत हेसुद्धा...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या