Coronavirus : वर्षभरात कोरोनाची साथ संपुष्टात येईल; मॉडेर्नाचे सीईओ बॅन्सेल यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 09:07 AM2021-09-26T09:07:05+5:302021-09-26T09:07:46+5:30

जगभरातील जास्तीत जास्त लोकांना लस मिळून कोरोनाची साथ पुढील वर्षभरात पूर्णपणे संपुष्टात येण्याची शक्यता असल्याचं बॅन्सेल यांचं वक्तव्य.

coronavirus pandemic will end within next year says moderna vaccine ceo in interview pdc | Coronavirus : वर्षभरात कोरोनाची साथ संपुष्टात येईल; मॉडेर्नाचे सीईओ बॅन्सेल यांचे वक्तव्य

Coronavirus : वर्षभरात कोरोनाची साथ संपुष्टात येईल; मॉडेर्नाचे सीईओ बॅन्सेल यांचे वक्तव्य

Next
ठळक मुद्देजगभरातील जास्तीत जास्त लोकांना लस मिळून कोरोनाची साथ पुढील वर्षभरात पूर्णपणे संपुष्टात येण्याची शक्यता असल्याचं बॅन्सेल यांचं वक्तव्य.

पुढील वर्षभरात कोरोनाची साथ पूर्णपणे संपुष्टात येईल, असा विश्वास मॉडेर्ना या लसउत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) स्टीफन बॅन्सेल यांनी व्यक्त केला आहे. जगभरात वाढती मागणी लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंधक लसींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जात आहे.  गरीब देशांतील एकूण लोकसंख्येपैकी अवघ्या २ टक्के लोकांनाच आतापर्यंत लस देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर बॅन्सेल यांचे विधान पटत नाही, असे काही वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.

स्वित्झर्लंडच्या एका वृत्तपत्राला मुलाखत देताना स्टीफन बॅन्सेल म्हणाले की, जगामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे प्रचंड प्रमाणावर उत्पादन होत आहे. अशा रीतीने जगभरातील जास्तीत जास्त लोकांना ही लस मिळून कोरोनाची साथ पुढील वर्षभरात पूर्णपणे संपुष्टात येण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, लस मिळालेल्या व्यक्तींना कोरोना विषाणूपासून संरक्षण प्राप्त झाले आहे. मात्र ज्यांना अद्याप लस उपलब्ध झालेली नाही त्यांना संसर्गाचा मोठा धोका आहे.

२९,६१६ नवे रुग्ण
शनिवारी भारतात कोविड-१९ साथीचे आणखी २९,६१६ नवे रुग्ण आढळून आले. त्याबरोबर देशातील एकूण रुग्णांची संख्या आता ३,३६,२४,४१९ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही १,२८० ने वाढून ३,०१,४४२ झाली आहे.

Web Title: coronavirus pandemic will end within next year says moderna vaccine ceo in interview pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.