शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: आम्ही लग्नाळू! लॉकडाऊन हटताच ‘या’ देशात ऑनलाईन विवाह नोंदणीत ३०० टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 14:48 IST

चीनच्या वुहान शहरात कोरोना महामारी मोठ्या प्रमाणात पसरली या महामारीमुळे वुहानमध्ये लोकांना सक्तीनं घरात बंदिस्त ठेवण्यात आलं होतं.

ठळक मुद्देचीनच्या वुहान शहरातून जगभरात कोरोनाने घातलं थैमानकोरोनामुळे चीनच्या वुहान शहाराला बसला होता मोठा फटका अखेर ७६ दिवसानंतर चीनमधील लॉकडाऊन हटवण्यात आलं

वुहान – चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरातील २०० देशांना विळखा घातला आहे. १७ लाखांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी बहुतांश देशांनी लॉकडाऊन केले आहे. चीनमध्ये लॉकडाऊन केल्यामुळेच कोरोना संक्रमण नियंत्रणात आणता आलं.

चीनच्या वुहान शहरात कोरोना महामारी मोठ्या प्रमाणात पसरली या महामारीमुळे वुहानमध्ये लोकांना सक्तीनं घरात बंदिस्त ठेवण्यात आलं होतं. अखेर ७६ दिवसांच्या कालावधीनंतर चीनमधील लॉकडाऊन हटवण्यात आलं आहे. फ्लाईट्स, बस, ट्रेन वाहतूक सुरु झाली आहे. थिएटर, मॉल्स, भाजी मार्केट उघडण्यात आली आहे. याठिकाणी लॉकडाऊन हटताच युवक वर्गाने लग्नाचा सपाटा सुरु केला आहे. लग्नासाठी ऑनलाईन वेबसाईटवर ३०० टक्के ट्रॅफिक वाढलं आहे. चीनमध्ये सर्वात जास्त वापर होणाऱ्या पेमेंट अँपनुसार एकाच वेळी इतके युजर्सने अँपचा वापर केला त्यामुळे ते बंद पडलं. परंतु वेबसाईट क्रॅश झाली नाही. मात्र वारंवार रिफ्रेश करण्याची गरज भासू लागली.

विवाह नोंदणी करणाऱ्या भावी वधुवरांची संख्या वाढली आणि लग्नाच्या कपड्यांची बुकींगही वाढली आहे. फेब्रुवारी आणि मार्चपासून लग्नाचे रजिस्ट्रेशन बंद करण्यात आले होते. मात्र स्थिती सामान्य होताच लोकांनी पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात लग्नांची तयारी सुरु केली. वुहानसह अनेक शहात प्री-वेडिंग शूट सुरु झालेत. कपल्स वेगवेगळ्या लोकेशनवर जाऊन फोटोशूट करत आहेत. त्याचसोबत आवश्यक सावधानतही पाळली जात आहे.

चीनमध्ये विवाह नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करताना जोडप्यांना आपला आरोग्य अहवालही सादर करावा लागणार आहे. कोरोना तपास रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण मानली जाईल. अ‍ॅलिपेच्या प्रवक्त्याने सांगितले की, लॉकडाऊनमुळे घटस्फोटाच्या प्रमाणातही वाढ झाली होती मात्र यानंतर, अचानक विवाह नोंदणीच्या बाबतीत इतकी वाढ होईल, अशी अपेक्षा नव्हती. लॉकडाऊनमुळे अनेकांना घराची बसावं लागलं होतं. कोणालाही एकमेकांना भेटता येत नव्हतं मात्र लॉकडाऊन हटवताच लोकांनी पहिल्यांदा विवाह उरकण्यास प्राधान्य दिलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्नchinaचीन